- भारतराज पवार : मुख्य संपादक. आपल्या परिसरातील बातम्या , जाहिराती साठी संपर्क : ९१५८४१७१३१
मुंबई / ठाणे – कटा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : गेल्या कित्येक वर्षांपासून निविन जिल्हा निर्मितीचे घोंगडे भिजत पडले होते .जिल्हा व्हावा यासाठी अनेक आंदोलने पण झाली होती.परंतु आंदोलकांना जिल्ह्याचे गाजर दाखवले गेले ते आजतागायत लोंबकळत ठेवले होते.शेवटी आंदोलकांनी जिल्हा निर्मिती करावी असे म्हणण्याचा नादच टाकून दिला होता. मालेगाव करांनी सुद्धा आशा सोडून दिली होती.परंतु त्यांनी अपेक्षा मात्र जिवंत ठेवली होती.त्यांची अपेक्षा सध्या शासन पुर्ण करणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अनेक वर्षांपासून मालेगाव व कळवण जिल्ह्याची यादी मात्र प्रलंबित होती.त्यामुळे आता नव्याने २१ जिल्हे तयार होणार असून यंदा २६ जानेवारी २०२५ रोजी राज्यातील नवीन जिल्हे घोषित होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे त्रिभाजन तर नाशिक- ठाणे जिल्ह्याचे दुभाजन आणि १५ जिल्ह्यांचे विभाजन करण्याचा प्रस्तावाला शासनाने गती दिली आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी नाशिक – ठाणे जिल्ह्यांचे दुभाजन , अहमदनगर जिल्ह्याचे त्रिभाजन तर तब्बल १७ जिल्ह्यांचे विभाजन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.नवीन जिल्ह्यांच्या निर्मिती साठी २०१८ मध्ये मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली समितीने सादर केलेल्या २२ जिल्हे व ४९ तालुके निर्मितीच्या प्रस्तावाला शासनाने गती दिली आहे. येत्या २६ जानेवारी पासून नवीन जिल्हा व नवीन तालुके घोषित करण्यात येणार असल्याचे समजते.
जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव – नवीन होणारा जिल्हा _ कंसात मूळ जिल्हा – मालेगाव व कळवण ( नाशिक ) , मीरा भाईंदर व कल्याण ( ठाणे ) , उदगीर – ( लातूर व नांदेड ), खामगाव – (बुलढाणा ) , पुसद -(यवतमाळ) , अचलपूर – ( अमरावती ), साकोली – ( भंडारा ) , चिमूर – ( चंद्रपूर ), अहेरी – ( गडचिरोली ) , भुसावळ – ( जळगाव ) , आंबेजोगाई -( बीड) , चिनवट -( नांदेड) , माणदेश – ( सांगली/ सातारा/ सोलापूर ) , बारामती – ( पुणे ) , जव्हार – ( पालघर ) , मंडणगड – ( रत्नागिरी ) , महाड – ( रायगड ) , शिर्डी , संगमनेर व श्रीरामपूर _ (अहमदनगर) नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिह्यात येणारी तालुके – मालेगाव प्रस्तावित जिल्हा – मालेगाव , सटाणा , देवळा , नांदगाव , चांदवड , सटाणा – नामपूर , ताहाराबाद . मालेगाव – झोडगे , नांदगाव – मनमाड , देवळा – उमराणे . कळवण प्रस्तावित जिल्हा _ कळवण , दिंडोरी , सुरगाणा , पेठ .कळवण – अभोणा , कणाशी , हतगड सुरगाणा _ बोरगाव .पेठ – करंजाळी, हरसुल दिंडोरी – वणी , ननाशी .





