भारतराज पवार : मुख्य संपादक. संपर्क : ९१५८४१७१३१ मुंबई : कटा महाराष्ट्र न्यूज : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून मंत्रालयातील सर्वच विभागांसाठी पुढील १०० दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेतला जात असल्याने शालेय शिक्षण विभागाचा आढावा घेत असताना शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार असा विश्वास शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करणे, शिक्षण विभागाने गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी आवश्यक पाऊले उचलावीत अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही याबाबत सांगितले की , सीबीएसई पॅटर्नचा हानिकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करणे , शाळांना गुणवत्तेनुसार रँकिंग देणे , एका केंद्रात किमान एका शाळेमध्ये दहावी पर्यंत शिक्षण व्यवस्था निर्माण करून त्या शाळा आदर्श तर त्यातील एक वर्ग स्मार्ट वर्ग करणार असल्याची माहिती भुसे यांनी यावेळी दिली. सन २०२६ – २७ मध्ये सीबीएसई पॅटर्नचा वापर केला जाईल असे ही शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे राष्ट्रगीता पाठोपाठ जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत होणं आवश्यक असल्याचे मत भुसे यांनी यावेळी व्यक्त केले. तर राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण शक्तीच करणार असल्याचेही शिक्षणमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्ये शिकवण्यावर भर द्यावा , शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांना घडविणारे उत्कृष्ट शिक्षक ही मोठी संपत्ती आहे. त्याचा इतरांसाठी आदर्श म्हणून उपयोग करा. अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केल्या.
