देवळा : कटा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : भारतराज पवार : नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील पोलिसांचा अवैध धंद्यावरील वचक कमी झाला असून त्यामुळे तालुक्यात अवैध धंद्यांना माज आला आहे.कुठे गावठी दारू तर कुठे मटका धंदा काहीसे बाळसे पकडताना दिसत आहे.त्यामुळे सुशिक्षित तरुण पिढी लयास तर गेलीच त्याही पलीकडे बरबाद होण्याच्या मार्गावर दिसते आहे. याबात माळवाडी गावातील आखर वस्ती ( आदिवासी वस्ती ) तील हे धंदे फोफावले असल्याचे समजते.याबाबत देवळा पोलिसांनी का बघ्याची भूमिका घ्यावी ? लाचेचा नंगानाच असेच यावरून म्हणता येईल. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींचे रहाणे मुश्किल झाले आहे. कारण हे अवैध धंदेवाले अवैध धंदा तर करतातच परंतु यांच्या विरोधात कुणी आवाज उठविला तर त्यास धमकी देत मारहाणीचे प्रकार करत असतात.यांना नेमका आशीर्वाद कोणाचा म्हणावा ? हे आपणास सांगण्यास नको. जर पोलिसांनी दुर्लक्ष केलेच तर ह्या या धंद्यांमुळे गावागावात समाजl समाजात एखाद्यावेळी फरमोठे भांडण झगडा होण्याचा संभव नाकारता येत नाही म्हणून शहाण्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे आणि अवैध धंद्यांना आशीर्वाद न देता कायमचाच नायनाट करून जनतेत आनंदी वातावरण करून पोलीस आणि जनता असा विश्वास सार्थ करावा .
बातमी लिहिण्याचे निमित्त झाले काल देवळा पोलीस दलात पोलिसांची झोप उडविणारा त्यांची इज्जत धुळीस मिळवण्याचा आणि समस्त नागरिकात आश्चर्याचा धक्का बसल्याची घटना घडल्याने त्यामुळे पोलिसांची ईमानदारी चव्हाट्यावर आल्याने पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे त्यामुळे जिल्हा पोलीस दलासह महाराष्ट्रातील पोलिसांच्या इज्जतीचे खोबरे वेशीला टांगल्याचा प्रकार पोलीस अधिकाऱ्याकडूनच घडल्याने पोलिसांवर पर्यायाने पोलीस अधिकाऱ्यांवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वचक नसल्याचे या निमित्ताने बोलले जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील देवळा पोलीस ठाण्यात लाच स्वीकारताना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तथा ए एस आय यास नाशिक विभागाचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अलगद जाळ्यात ओढल्याने पोलिसांचे धिंडवडे निघाले .शनिवारी दु.१ वा.दरम्यान ही कारवाई झाल्याने देवळा पोलिसांची झोपच उडाली आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कैलास यशवंत जगताप यांनी एका प्रकरणातील तपासासाठी गुन्ह्यात अटक न करता तक्रारदारास मदत करण्या साठी वीस हजार रुपयाची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून सदरची माहिती दिली.यावेळी तक्रार दाराकडून दहा हजार रुपयाची लाच स्वीकारताना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कैलास यशवंत जगताप यांना रंगेहाथ पकडले.अर्थात अलगद जाळ्यात ओढल्याने येथील पोलिस सैरभैर झाले. विशेष म्हणजे यापूर्वीही कैलास जगताप याने दोन लाख पाच हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे त्याने स्वतः कबूल केले.त्यामुळे दोन लाख रुपयांचा मासा अलगत जाळ्यात ओढला गेल्याने संपूर्ण पोलीस दलाला हादरा बसला आहे.त्यामुळे देवळा पोलिसात खळबळ माजली तर आहेच त्यांचा (गैर)कारभार चव्हाट्यावर आला आहे. तर जगताप यांचे विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या घटनेमुळे पोलिसांचे इज्जतिचे खोबरे अधिकाऱ्यानेच वेशीला टांगल्याने देवळा पोलीस दलातील लाच मागण्याचा नंगानाच वाढल्याचे चित्र जनतेस पहावयास मिळाले आहे म्हणून जनतेत हळहळ व्यक्त केली जात आहे.तर पोलिसात इज्जतीचा प्रश्न पडला आहे.
ही यशस्वी कामगिरी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिला घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस उपअधीक्षक एकनाथ पाटील, सापळा पथक पो.हवा.सुनील पवार, संदीप वनवे, योगेश साळवे, चालक परशुराम जाधव यांच्या पथकाने केली.
आता तरी देवळा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव जाधव , सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी कुणाचीही मुलहिजा न करता स्वतः पारखी नजर टाकून अवैध धंद्यांचा वेळीच कायमचा बंदोबस्त करून शांततेचा भंग होणार नाही तरुण पिढी बरबाद होणार नाही या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी दबक्या आवाजात होऊ लागली आहे.





