भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क साधावा. संपर्क : ९१५८४१७१३१ मुंबई : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : आज ६ जानेवारी निमित्ताने देशातील तसेच राज्यातील आणि विशेषतः जिल्ह्यातील तमाम पत्रकारांना महाराष्ट्र न्यूज ( वेब चॅनल) आणि कसमादे टाइम्स ( साप्ताहिक वृत्तपत्र) तर्फे खूप खूप अनमोल शुभेच्छा …. आजचा दिवस पत्रकारांच्या दृष्टीने आणि शासनाच्या प्रसिद्धीच्या दृष्टीने तसेच समस्त जनतेच्या हिताने खूपच अनमोल आहे.कारण पत्रकार जनतेच्या समस्या आपल्या धारदार लेखणीतून परखड मांडून जनतेस न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो.तर याच दिवसापासून पत्रकारांच्या प्रथम लेखणीस सुरुवात झाली. तर शासनाने घेतलेले निर्णय , शासन अमलात आणणाऱ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम अर्थात प्रसिद्धीचे काम इलेक्ट्रॉनिक मीडिया असो वेब चॅनल असो किंवा वृत्तपत्र असो पत्रकार निर्भीड पणे आपल्या माध्यमातून प्रसिद्ध करून जनतेपर्यंत पोहोचवतात म्हणूनच पत्रकार, जनता आणि शासन यांच्या दृष्टीने आजचा दिवस अनमोलच आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मित्रहो ,
खरे तर ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण वृत्तपत्राच्या पहिला अंक प्रकाशित झाला, तसेच योगायोगाने ६ जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिवसही असल्यामुळे हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा होतो. १९६४ पासून दरवर्षी ६ जानेवारी रोजी हा दिन साजरा करण्याची प्रथा सुरु झाली. पत्रकारिता ही सार्वजनिक जीवनाशी निगडीत असून सार्वजनिक जीवनात काम करताना अनेकदा आरोप प्रत्यारोप होत असतात; परंतु याकडे दुर्लक्ष करून ज्या पत्रकारिता क्षेत्राने आपल्याला उभे केले त्या क्षेत्रात आपण प्रामाणिकपणे काम केलेच पाहिजे. काळानुरूप विकासाच्या व्याख्या बदलत असतात. त्यामुळे आपणाला नक्की कोणत्या प्रकारचा विकास हवाय, याचे भान पत्रकारांनी ठेवण्याची गरज आहे. पत्रकारिता करत असताना बाळशास्त्री जांभेकरांचे आदर्श बाळगणे गरजेचे आहे. सोशल मीडियासह अन्य पर्यायी माध्यमांचे वाढलेले प्रस्थ, तंत्रज्ञानात होणारे बदल आणि त्या स्वीकारण्यातील अडचणी, वर्तमानपत्रांचे बिघडलेले आर्थिक गणित आदी सर्व बाबी पत्रकारितेत काम करणाऱ्याच्या जिव्हाळ्याच्या आहेत.
सर्व पत्रकार बंधू भगिनींना राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…..
____ भारतराज पवार , राज्य मुख्यसंपादक , नाशिक , मालेगाव , दीपक शिंदे , खारघर , मुंबई . महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे. इच्छुक असलेल्या तरुण-तरुणींनी संपर्क साधावा. संपर्क : ९१५८४१७१३१ .





