भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक. मालेगाव : कटा. महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : गोरगरीब , तळागाळातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण घेता यावे तसेच राज्यातील प्रत्येक शाळेचा शैक्षणिक व गुणवत्तेचा दर्जा वाढविण्यासाठी शिक्षण क्षेत्र प्रयत्नशील असून वाजवीपेक्षा जास्त फी घेणाऱ्या संस्थांना लगाम घालण्यात येईल यासाठी शिक्षण विभाग आगामी काळात काम करणार आहे.आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेच्या समस्या , विद्यार्थ्यांच्या समस्या , येथील शिक्षकांचे कार्य असे चालते यासाठी पत्रकारांनी चला शाळेत जाऊ या हा उपक्रम राबवावा त्यामुळे शिक्षण क्षेत्राचा कायापालट नक्कीच होईल. असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी केले.
रोटरी क्लब ऑफ मालेगाव व्हिजन तर्फे पत्रकारांचा गौरव व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी मंत्री भुसे बोलत होते.पत्रकारांना शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते दर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी कसमादे टाइम्स व महाराष्ट्र न्यूज चे राज्य मुख्यसंपादक भारतराज पवार यांच्यासह इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडिया पत्रकारांचा गौरव भुसे यांच्या हस्ते करून पुरस्कार देण्यात आले.व्यासपीठावर प्रकल्प संयोजक संजय फतनानी , हेमंत शुक्ला , रोटी क्लब व्हिजनचे अध्यक्ष दीपक शेलार , उपप्रांतपाल राजेंद्र दिघे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योजक संजय फतनानी यांनी केले तर सूत्रसंचालन शिल्पा देशमुख यांनी केले.शेखर सोनवणे यांनी आभार मानले. रोटरीचे शामकांत दुसाने , सुभाष पाटील, डॉ.विशाल पाटील , डॉ.संदीप ठाकरे , डॉ. ऋषिकेश पाटील , विजय डोखे, यशवर्धन पाटील , सचिन पाटील , राहुल शिंदे , हरीश जांगीड , प्रा.संजय कांडेकर, विश्वनाथ निकम आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी साठी परिश्रम घेतले.

