भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक बातम्या आणि जाहिराती काही सेकंदात महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी बेधडक संपर्क साधा. ९१५८४१७१३१ . मुंबई : कटा . महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : फडणवीस सरकारने आय ए एस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या केल्या तर १७ आय ए एस अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन बदली करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील आय ए एस अधिकाऱ्यांच्या करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची बदली करण्यात येऊन त्यांच्या जागी सचिंद्र प्रताप सिंह यांची शिक्षण आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सिंह हे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. तर सूरज मांढरे यांची कृषी आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे.
याचबरोबर १७ आय ए एस अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन बदलीच्या ठिकाणी नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आले. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी यांना पदोन्नती देऊन त्यांची अल्पसंख्यांक विकास विभागाच्या सचिव पदी बदली करण्यात आली.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव एन नवीन सोना यांना प्रधान सचिव पदी पदोन्नती देण्यात आली. तर नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता तसेच मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव डॉक्टर सोनिया सेठी व दिनेश वाघमारे यांना अपर मुख्य सचिव म्हणून पदोन्नती देण्यात आले आहे .यांसह अनेक आय ए एस अधिकाऱ्यांना निवड श्रेणीतून पदोन्नती देऊन बदली करण्यात आली आहे.





