मुंबई / देवळा – कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क _ गेल्या २७ वर्षांपासून निर्भिड , कणखर , डॅशिंग पत्रकार म्हणून पत्रकारिता क्षेत्रात आदर्श नाव कमावलेले आणि आपल्या लेखणीतून अनेकांना घाम फोडणारे पत्रकार , भारतराज पवार यांची नवीन वर्षात लवकरच महाराष्ट्राच्या सत्ताधारी पक्षात प्रवेश होणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
आपल्या लेखणीतून त्यांनी अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांचे महाराष्ट्र भरातील अनेक जनतेशी , अधिकाऱ्यांशी चांगलेच संबंध असल्याकारणाने त्यांचा ह्या संबंधाचा फायदा पक्षास होणार असल्या कारणाने तसेच जिल्ह्यातील , प्रत्येक तालुक्यातील जनतेच्या , बेरोजगारांच्या , शेतकऱ्यांच्या समस्या, अडीअडचणी सोडविण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असणार याची दखल घेऊनच सत्ताधारी पक्षाने जिल्ह्याची कामगिरी पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
भारतराज पवार ” कसमादे टाइम्स ” ( साप्ताहिक वृत्तपत्र ) आणि महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल चे राज्य मुख्यसंपादक आहेत. तसेच त्यांनी आज पर्यंत अनेक सामाजिक संघटना , समिती यांचेवर जिल्हा व राज्य पातळीवर विविध पद भूषविली आहेत.





