माळवाडी येथे ” शिवज्योती ” फार्मर प्रोडूसर कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

0
72

भारतराज पवार : मुख्य संपादक                              आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात “पत्रकार” नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क साधावा.मो.९१५८४१७१३१          

देवळा / माळवाडी : देवळा तालुक्यातील माळवाडी गावी  आज शिवज्योती फार्मर प्रोडूसर कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रा. सतीश ठाकरे प्रा. डॉ. डी के आहेर, कसमादे महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक भारतराज पवार शिवचरित्रकार यशवंत गोसावी यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर गावातील तरुण वर्ग उपस्थित होता.  ठेंगोडा,लोहणेर , विठेवाडी , सावकी, भऊर, देवळा,फुले माळवाडी , माळवाडी ,दहिवड गावासह ” कसमादे तालुक्यातील पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या कांदा पिकास चांगला बाजारभाव व त्वरित रोख पेमेंट देऊन शेतकऱ्यांची होणारी हेळसांड ,शेतकऱ्यांची होणारी दमणूक थांबिविने तर शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना रोजगार मिळावा आणि त्याचसोबत ग्रामीण भागामध्ये सहकार व शेतकरी चळवळ मोठ्या प्रमाणात रुजवली जावी या उद्देशाने शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर काम करणाऱ्या माळवाडी येथील तरुणांनी शिवज्योती फार्मर प्रोडूसर कंपनीची स्थापना केली असल्याचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत ” शिवव्याख्याते ” यशवंत गोसावी यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले. माळवाडी आणि फुले माळवाडी सारख्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास हा बारमाही खुंटीलाच टांगलेला होता शेतकऱ्यांचे  उत्कृष्ट कांदा मालाचे पीक बऱ्याचदा कवडीमोल भावाने विकला जायचा शेतकऱ्यांची हिच हेळसांड थांबविण्यासाठी ,बेरोजगार युवकांना हाती काम मिळावे हाच हेतू ठेऊन शिवज्योती फार्मर प्रोडूसर कंपनीची स्थापना करून मुख्य कार्यालयाचे उद्घाटन करण्यात  आज करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल चे मुख्य संपादक, डायरेक्टर भारतराज पवार यांचा सत्कार महाराष्ट्र चे प्रख्यात शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांच्या हस्ते शाल , श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. याप्रसंगी संपादक पवार आणि शिवचरित्रकार यांच्यात पंचक्रोशीतील व गावातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काय ? आणि कसे पाऊले ?उचलावीत याविषयी सुमारे १५ मिनिटे चर्चा करण्यात आली .

त्यावेळी मयूर बागुल, भूषण बागुल, मोहित वाघ, खुशाल पवार, विवेक सोनवणे, सुरज अहिरे, विशाल बागुल, नरेंद्र बागुल, मुकुंद बागुल, महेंद्र बागुल, अनिल भामरे, भगवान आहेर, राजेंद्र बच्छाव, देवाजी बागुल, आनंदा वाघ राहुल बागुल, गणेश बागुल, निलेश गुप्ता यांच्यासह मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here