जि.प.प्रशासनाची इज्जत चव्हाट्यावर आली ! आशिमा मित्तल यांचेवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी निकाळे यांनी केली तर देवळा येथील कारवाई बाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी पांघरले गेंड्याचे कातडे ,आर्थिक व्यवहार केल्याचा संशय ? अंधेरी रात मे दिया तेरे हाथ मे असला प्रकार नाशिकच्या शिक्षण क्षेत्रात चालू..!

0
75

भारत पवार : मुख्य संपादक.                                   महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क साधावा तसेच आपल्या परिसरातील बातम्या ,जाहिराती साठी संपर्क: मो.९१५८४१७१३१.                                       नाशिक : क टा.महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क नाशिक जिल्हा परिषद नेहमी या ना त्या कारणाने चव्हाट्यावर येत असते. गेल्या काही महिन्यात येथील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पाटील यांच्या गैर व्यवहारामुळे जिल्हा परिषदेची हवा दूषित झाली होती.पाटील यांना जेलची हवा खावी लागली होती तरी सुद्धा प्रशासनाने त्यांचे पुनर्वसन त्याच जागेवर पुन्हा केल्याने शिक्षण विभागातील कारभार अधिकच दूषित होत असल्याचे पाटील यांच्या गैर कारभारावरून दिसत आहे.त्यांच्या भोंगळ आणि बेजबाबदार कारभारास वाचा फोडण्या साठी मल्हार खान ,गंगापूर रोड नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ता अनिकेत निकाळे यांनी सी ई ओ आशीमा मित्तल यांना भेटून शिक्षण अधिकाऱ्यांविरुद्ध रीतसर तक्रार दाखल करू हा हेतू मनाशी ठेऊन निकाळे मित्तल यांच्या कार्यालयाचे उंबरठे सारखे झिझउ लागले.दोन ते तीन वेळा भेट होऊनही सी ई ओ यांनी निकाळे यांची तक्रार ऐकण्यास मनस्थिती दाखवली नाही.त्यांना वेठीस धरू लागले.अखेर वैतागून अनिकेत निकाळे यांनी एके दिवशी मॅडम मित्तल यांना जयभीम जय महाराष्ट्र करत मला शिक्षण अधिकाऱ्यांविरुद्ध तुमच्याकडे तक्रार करायची आहे त्यावर मॅडम मित्तल खेखसल्या मी तुमच्या लोकांचें काम करण्यास येत नाही आमचेही काही कामे असतात तुम्ही नंतर कधी तरी या असे सांगितले. पुनश्च मी मित्तल यांना भेटण्यास गेलो असता पुन्हा तुम्ही माझ्या ऑफिसला यायचे नाही अन्यथा सरकारी कामात अडथळा आणला असा गुन्हा तुमच्यावर दाखल करेन अशी धमकी देत मला बाहेर जाण्यास भाग पाडले. एक प्रकारे बौद्ध समाजाचा तिटकारा मॅडम करत असल्या कारणाने माझी तक्रार ऐकून घेणे ऐवजी मलाच उलट धमकी देत भ्रष्टअधिकाऱ्यास व त्याच्या गैर कारभारास एक प्रकारे प्रोत्साहन देत असल्याने शिक्षणाधिकाऱ्यांचा गैर कारभार अधिकच बाळसं पकडत आहे तर मित्तल मॅडम यांचा मनमानी कारभार अधिकच वाढला आहे.त्यामुळे मित्तल यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी अनिकेत निकाळे यांनी विभागीय महसूल आयुक्त नाशिक ,सहा.पोलीस आयुक्त ,सरकारवाडा ,नाशिक शहर पोलिस यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. असाच गैर कारभार  गेल्या सात ते आठ महिन्यांपासून प्रवीण  पाटील जिल्हा शिक्षणाधिकारी ,माध्यमिक यांनी देवळा एज्युकेशन सोसायटी संदर्भात चालविला असून त्यांनी त्या संस्थेचे चेअरमन, दोन मुख्याध्यापिका व चित्रकला शिक्षक यांचे विरुद्ध कारवाई करण्यात चालढकल करून जाणून बुजून कर्तव्यात कसूर करून संबंधितांना अभय दिले जात आहे . आतापर्यंत फक्त संबंधित संस्थेच्या चेअरमन यांना १५ दिवसांच्या आत तुमचा अहवाल पाठवा  एवढीच कागदोपत्री कारवाई केल्याचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे कार्यालयातर्फे  सांगण्यात आले.मात्र चेअरमन यांनी त्या कागदपत्रास न जुमानता चार महिने झाले तरी अहवाल न देता शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांचेवर पुढील कार्यवाही करणे ऐवजी आज पावतो अभय दिले. मग प्रश्न असा पडतो शिक्षणाधिकाऱ्यांपेक्षा चेअरमन व त्यांचे शिक्षक उच्च दर्जाचे की त्यांचे पेक्षा अधिकाराने श्रेष्ठ असतात? याचे भान शिक्षण अधिकाऱ्यांनी ठेवणे गरजेचे आहे त्यांच्या ह्या कारभारामुळे स्वतःची तर जातेच परंतु संपूर्ण पवित्र शिक्षण खाते आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची पण जाते हे सुद्धा लक्षात ठेवणे आवश्यक आहे. संबंधितांविरुद्ध पुढील कठोर कारवाई नाही म्हणजे घाबरून की दबावाला बळी पडून म्हणा की आर्थिक साठे लोटे म्हणा यास बळी पडून शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचे पुढील पावले उचलले नाहीत.अंधेरी रात मे दिया तेरे हाथ मे असा प्रकार आणि कारभार शिक्षण अधिकाऱ्यांचा चालल्याचे दिसत आहे. उलट गेंड्याचे कातडे पांघरून आमचे चांगले चालले आहे असा भास शिक्षणाधिकारी कार्यालया मार्फत निर्माण केला जात आहे.तरी सुद्धा शिक्षणाधिकाऱ्यांचा आदर करत त्यांनी संबंधितांविरुद्ध येत्या काही दिवसात तक्रार अर्जात मागणी केल्याप्रमाणे कठोर कारवाई न केल्यास शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध सुद्धा लोकआयुक्तांकडे तक्रार दाखल केली जाणार आणि महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन तर्फे हा प्रश्न तडीस लावणारअसा इशारा पत्रकार भारतराज पवार यांनी यावेळी दिला.तर शिक्षण उपसंचालक यांनी देवळा एज्युकेशन सोसायटीच्या संदर्भात दखल घेतली असून त्यांच्या दालनात येकदा सुनावणी झाली असून दुसरी सुनावणी तारीख त्याच दिवशी न देता मी नंतर कळवणार असे सांगण्यात आले.दरम्यान शिक्षण क्षेत्रात भ्रष्ट कारभार अधिकच बळावला असून भ्रष्ट अधिकाऱ्यांना वालीच नसल्याने ते मात्र भन्नाट झाल्यासारखे भ्रष्ट हात करण्यात सुसाट पळत असल्यामुळे पवित्र ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षण क्षेत्रात अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे काळीमा फासला जात आहे.हे उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे असून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या नांग्या वेळीच ठेचल्या पाहिजेत असे झाले तर शिक्षण क्षेत्रातीलआपले नाव नक्कीच उज्वल होण्यास वेळ लागणार नाही हे तितकेच खरे. मात्र खरे ते खरेच असते म्हणतात ना भगवान के घर देर है अंधेर नही खरे उशिरा का होईना न्याय देणारच आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्याची किंमत मोजावी लागणारच हे सुद्धा तितकेच खरे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here