अन्नदात्या शेतकऱ्यांवर केंद्र शासनाचा विश्वास नाही ? शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला…केंद्रीय पथक कांदापीक पाहणी करणार

0
79

भारत पवार : मुख्य संपादक                               संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार नियुक्ती साठी तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क मो.९१५८४१७१३१                                           देवळा : कटा.महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क: अन्नदात्या शेतकऱ्यांवर केंद्र शासनाचा विश्वास नाही की काय ? अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसली आहे शेतकरी थंडी, ऊन ,वारा, पाऊस तर सद्याची दुष्काळ सदृश्य परिस्थितीची तमा न करता त्यातच पीक लावणी साठी कर्जाचा डोंगर उभा करून शेतात पीक घेत असतो तर रात्रंदिवस दिवसाची रात्र करून पिकास पाणी देत असतो. एवढे करून केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला. कांदा पिकावर निर्यात बंदी लादली गेली .समस्त शेतकरी निर्यात बंदी उठविण्यासंबंधी टाहो फोडत असताना सुद्धा केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी अद्याप उठवली नसल्याने शेतकऱ्यात संताप व्यक्त केला जात आहे .तर येत्या सहा तारखेला केंद्रीय पथक कांदा पिक पाहणी दौरा करणार असल्याची माहिती महाराष्ट्र न्यूज च्या हाती आली आहे. चार , पाच महिन्यांपूर्वी दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर येवुन पाहणी करण्यासाठी आय,ए एस दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश असलेले शिष्टमंडळ आले होते, एका दिवसासाठी आलेल्या शिष्टमंडळाने खरंच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली, हा संशोधनाचा विषय होऊ शकतो, जिल्ह्या क्रुषीअधिकाऱ्याच्या निगरानीत कुठेतरी दुष्काळाने होरपळलेल्या कांदा पिकाची पाहणी केली, शेतकऱ्यांच्या कांदा पिक उत्पादनाचा अंदाज बांधत, शितावरून भाताची परीक्षा करत एकुण उत्पादनांत ५०% घट होईल असा रिपोर्ट दिला होता जेनेकरुन दुष्काळाने होरपळलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भरीव अशी आर्थिक मदत दिली जाईल,पण झाले उलटेच उत्पादनात मोठी घट होनार असं ग्रुहीत धरून मोठ्या प्रमाणात होनारी कांदा निर्यातीला अचानक ब्रेक लावुन निर्यात बंदी लादली गेली,तसाच काहीसा प्रकार यावेळी ही घडु शकतो, केंद्र सरकार उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेणं अपेक्षित असताना संख्येने अधिक असलेल्या शहरी भागातील ग्राहक हितासाठी ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकऱ्यांचा बळी देउ नये, याकरिता केंद्रीय पथक जर आपल्या बांधावर आले तर त्यांना आपण विचारलं पाहिजे की आपण नेमके कशासाठी पहाणी दौरा करत आहात? पहाणी दौऱ्यातुन शेतकऱ्यांच्या पदरात काही पडणार आहे का? तसं असेल तरच तुम्ही येथे थांबा नाहीतर आपण आमच्या बांधावरुन मुकाट्याने चालते व्हा ! अशी ठाम भूमिका कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे, असे परखड मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केले असून समस्त शेतकरी बांधवांनी एक होऊन आपल्या भूमिकेवर ठाम राहून आपल्या पदरात जर पडत नसेल आणि केंद्र सरकार किती वेळा पाहणी दौरा अवलंबून शेतकऱ्यांना वेठीस धरणार ? आणि शेतकऱ्यांच्या तोंडात पाने पुसणार ? असे प्रश्न आता शेतकऱ्यांना भेडसावत असून शेतकऱ्यांनी पाहणी दौरा निमित्त येणाऱ्या अधिकाऱ्यांना चले जावच्या भूमिकेवर ठाम रहावे. व येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत शेतकरी काय असतो ? याची जाणीव व आठवण केंद्र सरकारच्या नेत्यांना करून द्यावी असे आवाहनही कुबेर जाधव आणि पत्रकार भारत पवार यांनी यानिमित्ताने शेतकरी बांधवांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here