शरदचंद्र पवार संजीवनी आरोग्य मित्र उपक्रमात सहभागी व्हा : डॉ.नितीन पाटील

0
52

भारत पवार : मुख्य संपादक.                                   आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.मो. ९१५८४१७१३१

मालेगाव / जळगाव कटा. महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क – शरदचंद्र पवार संजीवनी आरोग्य मित्र या उपक्रमांतर्गत कार्यशाळा आणि भव्य मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी डॉ. सेलमार्फत पुणे येथे दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या कालावधीत निसर्ग कार्यालय मार्केट यार्ड पुणे येथे करण्यात येणार आहे.या कार्यशाळेत जळगाव,धुळे, नंदुरबार,नाशिक, अहमदनगर या उत्तर महाराष्ट्रातील डॉ.सेलच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा व ज्या पदाधिकाऱ्यांना रुग्णसेवेची आवड आहे त्यांनी या कार्यशाळेत सहभाग नोदवावा या कार्यशाळेचे व मेळाव्याचे उद्घाटन मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते होणार आहे.प्रदेश अध्यक्ष मा.जयंतराव पाटील साहेब, मा.खासदार सुप्रियाताई सुळे आणि मा.आमदार रोहित पवार हे उपस्थित असणार आहेत.राष्ट्रवादी डॉ.सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ.सुनील जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा होणार असून मेळाव्यात सहभागी होऊन नाव नोंदणी करावी असे आवाहन उत्तर महाराष्ट्र विभागीय डॉ .सेलचे अध्यक्ष डॉ.नितीन वसंतराव पाटील यांनी केले आहे. या मेळाव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील उपचारांची गरज असलेल्या लोकांना सर्व योजना सर्व हॉस्पिटल यांचे मार्गदर्शन होणार असून त्यासाठी टोल फ्री नंबर सुद्धा उपलब्ध होणार आहे यामुळे हा उपक्रम एका मोठ्या चळवळीचे स्वरूप घेणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here