जनसेवेसाठी पूर्ण वेळ देणार : लंकेश बागुल

0
212

भारत पवार  : मुख्य संपादक  : ९१५८४१७१३१.       देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता पूर्ण वेळ जनसेवे साठीच देणार अशी माहिती फुले माळवाडी येथील सरपंच लंकेश सीताराम बागुल यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना दिली.                                देवळा तालुक्यातील फुले माळवाडी येथील ग्रामपंचायतीच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत लंकेश बागुल प्रचंड मतांनी थेट सरपंच पदा साठी निवडून आले. जनतेने माझ्यावर विश्वास ठेऊन मतदानातून सर्वच स्तरातून मला भरपूर आशीर्वाद देऊन निवडून दिले.त्याबद्दल जनतेचे त्यांनी आभार व्यक्त करत जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला तडा जाऊ देणार नाही. आणि जनसेवा करण्यास मी पूर्ण वेळ देणार असेही त्यांनी यावेळी सांगितले.                                            शासनाच्या अनेक योजना असतात त्या राबविण्यासाठी मी प्रामाणिक पणाने प्रयत्न करणार असून घर घर योजना अशी आपली भूमिका असणार आहे.त्यामुळे जनहिताची शासनाची कोणतीही योजना असेल ती योजना मी जनतेसाठी राबविणार आणि फुले माळवाडी नंदनवन केल्या शिवाय राहणार नाही असे ही सरपंच लंकेश बागुल यांनी सांगितले.आता पर्यंत सगळ्यात तरुण सरपंच म्हणून लंकेश बागुल यांचा उल्लेख केला जात आहे.विशेष म्हणजे बागुल हे जनतेतून थेट सरपंच म्हणून पहिल्यांदाच आणि पहिल्याच प्रयत्नात निवडून असल्याने त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे.कोणासही नाराज न करता काम करून देणे.वाईट न बोलणे किंवा कोणीही असो त्यास विरोध न करता काम करणे हे गुण आजही लंकेश बागुल यांच्यात पहावयास मिळतात.त्यांचे वडील सीताराम बागुल यांनी आजपर्यंत जनतेत राहूनच सगळ्यांशी हिगुज करत मोठा मित्र परिवार उभा केला आहे.त्यांचेच गुण सरपंच बागुल यांच्यात पहावयास मिळतात.त्यामुळे बागुल यांनी सरपंच पदा पर्यंत मजल मारत जन हितासाठी झिजने हा विडाच उचलला असल्याचे त्यांच्या काम करण्याच्या कृती वरून दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here