क्रिकेट :शमीच्या गोलंदाजी मुळे न्युझीलंड चारी मुंड्या चित ,भारत चौथ्यांदा वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत, पंतप्रधानांना शमीची भुरळ

0
163

भारत पवार  : मुख्य संपादक : मो.९१५८४१७१३१.   मुंबई : संपूर्ण देशात दिवाळी सणाचा उत्साह जोरदार साजरा होत असतानाच सोबत भारतच्या क्रिकेटवीरांनी भारत वासियांना सुखद गोड मेजवानी दिल्याने संपूर्ण देश विजयाचा आनंद जल्लोषात साजरा करत आहे.बरोबर अनेकांनी फटाक्यांची तुफान फटकेबाजी करत आनंद व्यक्त केला.

मोहम्मद शमी जगात भारी ठरलाय त्याने अनेकांचे डोळ्यांचे पारणे फेडले.तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मात्र भुरळच पडल्याचे मोदींनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.

 

मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर अत्यंत चुरशीच्या लढतीत न्युझीलंड विरुद्ध झालेल्या वर्ल्ड कप सेमी फायनल मध्ये भारताने ७० धावांनी विजय मिळवत वर्ल्डकप अंतिम फेरीत प्रवेशाचा मानकरी ठरला.

शमीच्या गोलंदाजी मुळे न्युझीलंड चारी मुंड्या चित. एका मॅचमध्ये १० हून अधिक केले वर्ल्ड रेकॉर्ड. भारता कडून शमीने ७ विकेट घेतल्याने न्यूझीलंडच्या चारी मुंड्या चित केल्या.

 

सुरुवातीची फलंदाजी करणाऱ्या भारताने न्युझीलंड समोर ३९८ धावांचा डोंगर रचला होता.उत्तरादाखल त्यांचा डाव ३२७ धावात गुंडाळण्यात आला.आणि भारताने हि मॅच ७० धावांनी जिंकून वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्याचा मान पटकावला.

न्यूझीलंडने शानदार सुरुवात केली होती परंतु मोहम्मद शमीने न्यूझीलंडच्या डावात पहिले भगदाड पाडले.त्यानंतर मिशेल आणि केन विलिम्सन यांनी १८१ धावांची खेळी करत भारताची चिंता वाढवली होती.पण शमी पुन्हा एकदा संघाच्या मदतीला येताच त्याने मिशेल  आणि केन ही जोडी दानोफान केली.३३ व्या ओव्हर मध्ये शमीने केन आणि लेथम यांना बाद केले.या दोन विकेट्सह शमीने वर्ल्डकप मध्ये ५० विकेचा टप्पा पार केला. वर्ल्डकप मध्ये अशी कामगिरी करणारा शमी पहिलाच क्रिकेटवीर ठरलाय.

 

 

भारताने प्रथम खेळताना ५० षटकात ४ बाद ३९७ धावा केल्या.आणि न्यूझीलंडला ४८.५ षटकात  ३२७ धावात गुंडाळून ७० धावांनी विजय मिळवत वर्ल्डकप मध्ये चौंध्यांदा अंतिम फेरीत प्रवेश पटकावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here