
भारत पवार : मुख्य संपादक : मो. ९१५८४१७१३१ देवळा : तालुक्यातील फुले माळवाडी ग्रामपंचायतीची थेट सरपंच पदाची निवडणूक अत्यंत चुरशीची पार पडली.या निवडणुकीत कधी नव्हे इतके देवळा तालुक्यातील जनतेचे लक्ष फुले माळवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे लागले होते.मात्र पहिल्या पासूनच ह्या गावाने रेकॉर्ड ब्रेक पॅटर्न राबविल्याने ते पॅटर्न फुले माळवाडीतील तरुण, तडफदार विकासी व्यक्तिमत्व मात्र ईमानदार असलेला उमदा असा लंकेश बागुल यांनी अखेर पर्यंत ठेवल्याने त्याचे महारष्ट्र न्यूज वेब चॅनल तर्फे विशेष कौतुक केले आहे. आणि अखेर लंकेशने उंच भरारी घेत फुले माळवाडी ग्रामपंचायतीवर स्वतःच्या हिमतीने झेंडा फडकवला आणि आपले कर्तृत्व सिद्ध केलेच.
सुरुवातीलाच नऊ सदस्यांपैकी आठ जागा लंकेश यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवडून आल्या होत्या.तर थेट सरपंच पदा साठी झालेल्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक २ मधील एका जागेसाठी अत्यंत चुरशीची निवडणूक पार पडली.यात थेट सरपंच पदाचे उमेदवार लोकमान्य ग्रामविकास पॅनलचे लंकेश सीताराम बागुल यांनी १०२७ मते मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवार सुरेश नथू शेवाळे यांचा पराभव करत ग्रामीण भागातील रेकॉर्ड ब्रेक पॅटर्न केले आहे.शेवाळे यांना अवघ्या २२४ मतांवर समाधान मानावे लागले.तर वॉर्ड क्रमांक दोन मध्ये कल्पना गंगाधर बच्छाव यांनी ३०२ मते मिळवत विजयी झाल्या त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार मंगला वसंत बच्छाव यांचा २०८ मतांनी पराभव केला.
वॉर्ड क्रमांक १ मधून संजय लक्ष्मण शेवाळे , सुरेखा दगडु शेवाळे , अनिता बापूराव बच्छाव , वॉर्ड क्रमांक २ मधून यशोदा भगाजी पवार , देवमन दादाजी बागुल , वॉर्ड क्रमांक ३ मधून सुनील गांगुर्डे , नंदकिशोर वसंत शेवाळे , वैशाली दत्तात्रय बच्छाव यांनी लंकेश बागुल यांच्या नेतृत्वाखाली आधीच बाजी मारून बिनविरोध निवडून आले आहेत.
लंकेश सीताराम बागुल यांनी १०२७ मते मिळवत घवघवीत यश संपादन करून जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत उंच भरारी घेत ग्रामविकास पॅनलचा झेंडा फुले माळवाडी ग्रामपंचायतीवर फडकावून सरपंच पदाची माळ पटकावल्याने सरपंच लंकेश बागुल यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे. ग्राम विकासाची शिदोरी फुले माळवाडी गावी नक्कीच येणार यात शंकाच नाही.त्यामुळे अशा विकासी कर्तृत्वान तरुण सरपंच यांचे महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल चे मुख्य संपादक भारतराज पवार आणि पत्रकार टीमने लंकेश बागुल यांचे अभिनंदन केले आहे. तर भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
सरपंच लंकेश बागुल यांनी सर्वच मतदार ग्रामस्थांचे आभार व्यक्त करत त्यांना धन्यवाद दिले आहेत.
