सहा.पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांचा सत्कार तर श्री. पिंपळेश्वर विद्यालयात पाटील यांचे विद्यार्थ्यांना लाभले मार्गदर्शन

0
78

भारत पवार : मुख्य संपादक  : आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा.संपर्क ९१५८४१७१३१

देवळा / वाखारी : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क  : देवळा तालुक्यातील वाखारी येथील श्री. पिंपळेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी नुकतेच शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात देवळा पोलीस स्टेशनचे सहाय्य पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.मेहनती शिवाय फळ नाही म्हणून प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीने अपार मेहनत करण्यासाठी आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे.जर तुम्ही अपार मेहनत घेत परीक्षेत यश मिळवत गेलात तर आय.पी. एस. किंवा आय. ए. एस.अधिकारी होण्यात कसलीही अडचण येणार नाही मेहनत करा.यश तुमच्या दारात आल्याशिवाय राहणार नाही असे दीपक पाटील सर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. त्याचबरोबर अपघाता समयी हेल्मेट चे महत्व आणि आवश्यकता काय ? याबद्दलही त्यांनी सांगितले.तर मोबाईल चांगला पण तितकाच वाईट सुद्धा आहे याविषयी सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले.सुरुवातीस ए पी आय दीपक पाटील सरांचा सत्कार मुख्याध्यापक खैरनार सर यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.तर मुख्याध्यापक खैरनार सर यांनी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याबाबत आपले मनोदय व्यक्त केले.मानसी आहेर ह्या विद्यार्थिनीने यावेळी मनोगत व्यक्त करून उपस्थित आमचे आभार मानले. कार्यक्रमास पो.हवा.संदीप चौधरी ,पो.हवा.शिंदे, पो.हवा.मोरे तसेच गावातील श्याम पवार,संदीप केदारे,व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साहेबराव पवार,डॉ.घुमरे,डॉ.नवले, मा.आदर्श शिक्षक जगदाळे सर,जेष्ठ पालक खंडूनाना शिरसाठ, प्रिया जाधव, वैशाली हिरे पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक खैरनार व पर्यवेक्षिका पगार मॅडम तसेच सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here