डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ वा वर्धापन दिन लोकमान्य टिळक महाविद्यालयात साजरा
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : मो.९१५८४१७१३१

मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : संजय बोर्डे : दिनांक २३ऑगस्ट रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५वा वर्धापन दिन लोकमान्य टिळक वरिष्ठ महाविद्यालयात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिजाई प्रतिष्ठानच्या संस्थापकीय अध्यक्षा जिजाबाई जाधव व प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेची सचिव उखाजी जाधव उपस्थित होते. प्रथमतः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विद्यापीठ ध्वजारोहन जिजाबाई जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रगीत तसेच विद्यापीठ गीत गायन घेण्यात आले.
याप्रसंगी सचिव उखाजी जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच जिजाबाई जाधव यांनी विद्यार्थ्यांना विद्यापीठ स्थापनेपासूनचा इतिहास सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चव्हाण सर यांनी केले. प्रास्ताविक शेळके सर यांनी केले. आभार प्रदर्शन हिवाळे सर यांनी केले. याप्रसंगी प्राचार्य तसेच सर्व प्राध्यापक वर्ग शिक्षेकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.