संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या महाराष्ट्रातील आमदार अपात्रतेचा निर्णय लवकरच : अध्यक्ष राहुल नार्वेकर
1 min read

ना.एकनाथ शिंदे ,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर , मा.उद्धव ठाकरे ( वरील छाया चित्रात दिसत आहेत ) भारत पवार : मुख्य संपादक : आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती साठी संपर्क करा.मो.९१५८४१७१३१

मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : मंत्रालयातून : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकरच घेणार असल्याची माहिती अध्यक्ष नार्वेकर यांनी सांगितली.महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने ११ मे ०२३ रोजी निर्णय दिला की , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवत आहे.महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या चालणाऱ्या झुंझ ला तीन महिने उलटून गेले.पुन्हा पळवापळवी ची खेळी यशस्वीपणे खेळली गेली तरी आमदार अपात्रतेच्या निर्णयास मुहूर्त मिळेना म्हणून की काय अद्याप याप्रकरणी फारशी कार्यवाही झाल्याचं दिसत नाही.आता या प्रक्रियेस लवकरच प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली जाईल.असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की,सुरुवातीला शिवसेनेच्या ठाकरे गटाची बाजू ऐकून धेतील.आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यासाठी संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेचं पालन केले जाईल त्यानुसार ही कारवाई केली जाईल. यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही कारवाई लवकर पार पाडण्यात येणार असेही त्यांनी सांगितले.