मालेगावचे वैभव ISO मान्यता प्राप्त ” ममता हॉस्पिटल” ! ” प्रख्यात डॉ.पंकज पगार व डॉ.सौ.अनुजा पगार यांची रुग्णांना मिळते “मायेची ममता”….!! येथे अनेक आजारांवर उपचार घेतात अनेक महिला आता !!!
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : जाहिराती आणि आपल्या परिसरातील बातम्या साठी तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहेत संपर्क : 9158417131 मालेगावचे वैभव ISO मान्यता प्राप्त ममता हॉस्पिटल

मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क :. म्ष्ट्र* नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मालेगाव येथील ममता हॉस्पिटल हे मालेगाव तालुक्यासह कसमादेना तालुक्यातील रुग्णांसाठी वैभव ठरले असून अनेक आजारांवर येथे माफक दरात उपचार केले जातात त्यामुळे कोणत्याही रुग्णास इतरत्र बाहेर गावी उपचार घेण्यास जावे लागत नाही असे ममता हॉस्पिटल चे संचालक प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ.पंकज शिवाजी पगार व डॉ.सौ.अनुजा पंकज पगार यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.
गेल्या २० वर्षां पासून ममता हॉस्पिटल मालेगाव येथील सूर्यकिरण अपार्टमेंट सटाणा रोड येथे कार्यरत असून हजारो महिला रुग्णांनी येथे अनेक विध आजारांवर उपचार घेतले आहेत.डॉ.पंकज पगार स्वतः स्त्रीरोग , प्रसूतीशास्त्र आणि कॅन्सर तज्ञ असून ते एम.बी.बी. एस., डी.जी.ओ. , डी. एन.बी. पदवी धारण केलेले आहेत.तर डॉ.सौ.अनुजा पंकज पगार यांनी ए.बी.बी. एस., डी. एम.आर. ई.पदवी प्राप्त केली असून ते सोनोग्राफी तज्ञ व रेडीओलोजिस्ट म्हणून प्रख्यात आहेत. स्पंदन सोनोग्राफी नावाने सेंटर चालवत असतात.ह्या डॉक्टर दाम्पत्यांचे वैशिष्ट्य म्हणजे रुग्णाच्या नातेवाईकांशी कुठल्याही प्रकारचे प्रश्न न करता पेशंटची तात्काळ तपासणी करून गरज असेल तरच पेशंटला तातडीने हॉस्पिटल मध्ये दाखल करून प्रथम उपचाराची सुविधा देणे आणि आजाराचे निदान झाल्यावर त्या आजारावर लागलीच उपचार सुरू करणे.तर ममता हॉस्पिटल मधील संपूर्ण स्टाफ हा रुग्णांसाठी *वरदान* ठरत आहे.येथील स्टाफ प्रशिक्षित असून रुग्णांशी आणि नातेवाईकांशी कायम हसतमुख राहून संयमाने बोलणे , रुग्णांबरोबरच रुग्णाच्या नातेवाईकांशी सुद्धा आदराने वागणे त्यांची विशेष काळजी घेणे तर अत्यावश्यक पेशंट साठी स्वतः डॉक्टर तात्काळ रुग्णांपर्यंत धाव घेत तपासणी साठी कार्यरत होत असतात.त्यामुळे येथील डॉक्टरांसह संपूर्ण स्टाफने रुग्णांच्या नातेवाईकांची आणि रुग्णांची *मने* जिंकली असून आज हजारो रुग्ण ह्या हॉस्पिटल मधून उपचार घेऊन बरे होऊन बाहेर पडत असतात तर अनेक जण उपचार घेत असतात.म्हणूनच ह्या ममता रुग्णालयात *मायेची ममता* मिळत असते असे अनेक बरे झालेले रुग्ण बोलत असतात.त्यामुळेच येथील स्टाफ रुग्णांसाठी *वरदान* तर ममता हॉस्पिटल हे मालेगाव मधील *वैभव* ठरले आहे. २००८ साली ह्या आय एस ओ ( ISO) नामांकन प्राप्त झाले असून ह्या हॉस्पिटल मध्ये सुसज्ज असे बाह्यरुग्ण विभाग, आंतर रुग्ण विभाग ,अती दक्षता विभाग, सुसज्ज प्रसूती रूम, सुसज्ज ऑपरेशन थिएटर ,सरकार मान्य गर्भपात केंद्र,कुटुंब नियोजन केंद्र ( दुर्बिणी द्वारे) , मुलबाळ होण्यासाठी गर्भ मुखातून दुर्बिणी द्वारे तपासणी,नवजात शिशू साठी फोटो थेरपी, सर्व मेडिक्लेम सुविधा उपलब्ध , इन्शुरन्स पॉलिसी ,सोनोग्राफी सेंटर,गर्भ पिशवी काढणे तसेच शिझेरियन प्रसूती त्याचप्रमाणे कॅन्सर चिकित्सा केंद्र ,फोटोथेरपी – नवजात अर्भकाच्या *कावीळ साठी* उपचार ह्या सर्व आजारांवर माफक दरात उपचार केले जातात.
शिवाय डॉ.अभय निकम ( एम. डी.),डॉ.नितीन घोरपडे,राहता ( Laproscopy surgeon) , डॉ.संजय अहिरे,(Oncosurgeon) , डॉ.श्रीधर दायमा ( Laproscopy surgeon) , डॉ.मनोज बच्छाव ( Tuboplasty Surgeon ) आदी तज्ञ डॉक्टर सुद्धा रुग्णांसाठी वेळीच उपचार देत असतात.सर्वच एकाच ” ममता” हॉस्पिटल मध्ये सुविधा आणि तज्ञ डॉक्टर उपलब्ध असल्याने रुग्णांची गैरसोय होत नाही हे ह्या हॉस्पिटल चे विशेष सांगता येण्या सारखेच आहे.
संततीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर सुद्धा जर काही कारणास्तव *मुल बाळ* पाहिजे असेल तर त्यासाठी सुद्धा शस्त्रक्रिया ह्या हॉस्पिटल मध्ये केली जाते असे येथील सहायक डॉक्टरांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे १) अपोलो म्युनिक हेल्थ इन्शुरन्स, २) एम. डी.इंडिया टी पी ए , ३) डेडीकेटेड हेल्थकेअर टी पी ए , ४) सिग्ना टी टी के , ५) फ्युचर जनरल , ६) हेल्थ इंडिया , ७) एच डी एफ सी ऍग्रो , ८) चोलामंडलम जनरल इन्शुरन्स , ९) मॅक्स बुपा , १०) आय सी आय सी आय लोबार्ड , ११) मेडीअसिस्ट इन्शुरन्स आदी नामवंत कंपन्यांचे कॅशलेस सुविधा ममता हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असून ह्या सुविधांचा लाभ रुग्णांनी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी अवश्य घावा असेही डॉ.पंकज पगार,डॉ.सौ.अनुजा पंकज पगार यांनी यावेळी सांगितले.