शोभा बल्लाळ राज्यस्तरीय महिला भूषण पुरस्काराने सन्मानित,सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव

0
81

भारत पवार : मुख्य संपादक : संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा.मो.9158417131.                                    पुणे : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क :  नुकताच अहमदनगर येथे माऊली संकुल सभागृह या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला. माननीय सौ.शोभाताई चंद्रकांत बल्लाळ यांना सरपंच सेवा सघाच्या वतीने प्रतिष्ठित समजला जाणारा राज्यस्तरीय महिला भूषण पुरस्कार माननीय हवामान अभ्यासक पंजाबराव डख ,भास्कर पेरे पाटील,बाबासाहेब पावसे,याच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. बल्लाळ यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक शेत्रात उल्लेखनीय केलेल्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.त्यामध्ये महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे,शेतीला जोडधंदा म्हणून व्यवसाय वाठीसाठी आवश्यक असे ट्रेडिंग देणे.पोल्ट्री फार्मचे ट्रेनिग देणे .हॉस्पिटल मधील गरजू लोकाची बिल कमी करून देणे.गरीब गरजू महिलांची मदत करणे. शैक्षणिक साहित्य देणे.आश्रमातील लोकांसाठी काम करणे.वृक्षारोपन करणे.अनाथ आश्रमात रक्षाबंधन साजरे करणे.स्वप्नल फाऊडेशन कडून विविध कामात प्रावीण्य मिळवलेल्या महिलांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते या आणि अश्या अनेक कामाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी त्रिमूर्ती शिक्षण सस्थेच अध्यक्ष साहेबराव घाडगे ,dr. सूधा कांकरिया,सरपंच सेवा सघाचे अध्यक्ष बाबासाहेब पा वसे,बापूसाहेब भुसाल,अशोक उबरकर,सुरेश भूसाल, दीपक डोखे आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यातील महिला भूषण पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरातून शोभा बल्लाळ यांचे कौतुक व अभिंनदन होत आहे.महाराष्ट्र न्यूज चे मुख्य संपादक भारत पवार यांनी त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here