चोरांचे चालले मस्त …! पोलीस प्रशासन मात्र सुस्त …शेतकरी झाले त्रस्त… जळगाव परिसरातील शेतकऱ्यांवर विजपंप चोरीचे संकट सुरूच
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी तसेच पत्रकार नियुक्ती साठी संपर्क करा. मो. ९१५८४१७१३१

निमगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : विशाल हिरे : मालेगाव तालुक्यातील जळगाव ( नि.) परिसरातील शेतकऱ्यांच्या वीज पंपाची नेहमी चोरी होत असल्याने शेतकऱ्यावर संकटांची मालिका सुरू झाल्याचे दिसून येत आहे. आधीच शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हैरान झाला आहे. शेतातल्या , पीक ऐन उमेदीत असताना पिकाला पाणी देण्याच्या वेळेसच परीसरात वीज पंपाची चोरट्यान कडून चोरी होत आहे तर नेहमी कुठल्या तरी शेतकरीचे विजपंप चोरीला जात आहेत.तालुका पोलीसात तक्रार दाखल करुन हि पोलीस प्रशासन मात्र सुस्त दिसत आहे. तर चोरटे मात्र गस्त घालून डाव साधत विजपपं चोरून नेत असल्याने शेतकऱ्यांवर संकटाची मालिका मात्र सुरूच आहे .पोलिसात तक्रार दाखल करूनही पोलीस सुस्त झाल्याचे दिसते.तपास कार्यात गती नसल्याने चोर चोरी करून त्यांचे अगदी मस्त चालले तर शेतकरी मात्र त्रस्त झाले आहेत.
परीसरातील बर्याच शेतकरी वर्गाने या आदी सुद्धा चोरीच्या घटना विरुद्ध पोलिसात
FI R दाखल केल्या असून पोलीस यंत्रणा मात्र अजूनही सुस्त झाल्याचेे दिसून येत आहे.. चोंढी जळगाव येथील सरपंच , उप सरपंच महेंन्द्र पाटील ,पोलीस पाटील व शेतकरी वर्ग यांनी पोलींसान कडे या आगोदर हि निवेदन व लेखी तक्रार देऊन हि पोलीस प्रशासन कडून मात्र टाळाटाळ होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे…सतत पाठ पुरावा करुन देखील गुन्हाचा छडा लाववा जात नाही ..शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे..आर्थीक तसेच मानसीक दुष्टी ने त्रस्त झालेला शेतकरी मात्र या घटनांनी हैरान झाला आहे.
लवकरात लवकर चोराचां शोध घ्यावा व शेतकरीना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून याबाबत तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मगर यांची भेट घेऊन चोरीच्या घटनेत स्वतः लक्ष घालून चोरांचा चाललेला वीजपंप चोरीचा धुमाकुळ थांबवावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र न्यूज चे पत्रकार विशाल हिरे यांनी भेट घेऊन केली.