देवळा स्टेट बँकेचे एटीएम ग्राहकांसाठी पनौती,असून अडचण नसून खोळंबा ,दक्ष अधिकारी दक्ष होतील का ?

0
94

भारत पवार : मुख्य संपादक : संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.मो.९१५८४१७१३१

देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : बँक म्हंटले की माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक असून अनेक जीवनापयोगी गरजा माणूस त्या द्वारे भागऊ शकतो.त्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या पोटाला चिमटा घेऊन बचत करतो ती बँकेत.यासाठी सगळ्यात महत्वाची बँक म्हणजे स्टेट बँक मात्र आघाडीवर आहे.परंतु ती चालविणारा म्होरक्या अर्थात मॅनेजर प्रत्येक मानवाशी निगडित असला तर ग्राहक पण निसंकोच पने आर्थिक व्यवहार करीत असतो.परंतु नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील स्टेट बँकचे अधिकारी ,कर्मचारी याला कायम छेद देत असतात बँकेत आलेल्या खातेदाराशी आदराने वागणूक देणे येथील बँक अधिकाऱ्यांना अवगतच नाही कायम अडेलतट्ट पणाची भूमिका ह्या अधिकाऱ्यांनी घेतलेली असते.आतातर ह्या बेंकेच्या एटीएम ने सुद्धा ग्राहकांची थट्टा घेणे सुरू केले आहे. एटीएम म्हटले म्हणजे २४ तास अविरत सेवा ग्राहकांना देणे गरजेचे आहे.आणि हा नियमच आहे.देवळा स्टेट बँकेचे एटीएम कायमच आजारी पडलेले असते.अगदी कालच हे एटीएम बंद अवस्थेत पडलेले आहे. यास बँक मॅनेजरने त्वरित चालू करण्याची तत्परता दाखवणे गरजेचे असताना एटीएम बंद का ठेवले ? याची पूर्व सूचना बोर्ड लाऊन ग्राहकांना का दिली गेली नाही ? यासारखे प्रश्न ग्राहक विचारत असून कायम ह्या एटीएमची अवस्था अशी होत असते त्यामुळे देवळा शहरात आणि तालुक्यात ग्राहक वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.सदरच्या बँक मॅनेजरने कर्तव्यात कसूर केली असून याबाबत उच्च स्तरावरून चौकशी होणे गरजेचे आहे.कायमच खातेदारांची गैरसोय होत असून हे एटीएम म्हणजे ग्राहकांसाठी पनौती ठरत असून एटीएम असून अडचण नसून खोळंबा आहे असे येथील नागरिकांनी संतापाने म्हटले आहे.त्यामुळे हे एटीएम तात्काळ सुरू करून कायम सुरळीत चालू राहील ग्राहकांना अविरत २४ तास सेवा मिळेल अशी अपेक्षा संताप व्यक्त केलेल्या ग्राहकांनी व्यक्त केली आहे तर येथील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वागण्यात सुसूत्रता आणावी अशी ही मागणी नाराज असलेल्या नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here