ग्रामपंचायतीचा जार त्यातही आहे का भ्रष्टाचार ?

0
80

भारत पवार : मुख्य संपादक : संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क मो.९१५८४१७१३१

देवळा / माळवाडी : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडी गावातील ग्रामसेवक संभाजी देवरे आणि सरपंच शिवाजी बागुल यांनी माळवाडी गावातील जनतेसाठी विकास कामांना जोर दिल्याने जनतेत काही अंशी समाधान वाटत आहे परंतु ग्रामसेवक देवरे यांच्या बालहट्ट पणाने जनतेत जास्त नाराजी पसरते आहे .हे देवरे यांनी हा हट्ट थांबविणे गरजेचे आहे.शासन जनतेच्या हिता साठी निर्णय घेत असते म्हणून काय बालहट्टाचे चोचले पुरविण्यासाठी नाही याचे भान देवरे यांनी ठेवले पाहिजे. खरा किस्सा असा झाला माळवाडी ग्रामपंचायतीने नागरिकांना उन्हाळ्यात थंड पाण्याची तहान भागविण्यासाठी थंड पाण्याची योजना अमलात आणली.ह्या योजनेचे गावातील गावकऱ्यांनी स्वागतच केले आहे.परंतु हि योजना शासनातर्फे आहे.ती फक्त ह्या महाशयांनी अमलात आणली आणि शासनाच्या योजना अमलात आणणे हे मात्र यांचे कामच आहे.परंतु किस्सा असा आहे ग्रामपंचायतीतर्फे पाण्याचा एक जार दिवसभरा साठी १५ रुपयाला दिला जाणार दुसऱ्या दिवसा साठी तुम्ही जार भरून घ्या किंवा रिकामा ठेवा तरी सुद्धा १५ रू.दिवस प्रमाणे किंमत मोजावी लागणार विशेष म्हणजे हा जार आपणास स्वतःस भरून घेऊन स्वतः उचलून घेऊन जावा लागणार यात ग्रामपंचायतीचा कोणताही कर्मचारी मदतीला सदर ग्रामसेवक महाशय देणार नाहीत ही किती मोठी हुकूमशाही म्हणावी लागेल म्हणजे पाण्यात राहून माशांची वैर घेणे हाच प्रकार देवरे महाशय करतात काय ? असा प्रश्न गावात चर्चिला जात आहे.जरी ग्रामपंचायतीच्या उत्पंनसाठी ग्रामसेवकांची कल्पना असेल हि त्यांची कल्पना चांगली पण असू शकते परंतु याचा हिशोब ठेवणे तितकेच गरजेचे आहे.कोणता पैसा कुठे खर्च केला त्या साठी ग्रामसभेचा ठराव घेऊन तरच खर्च करावा असा प्रामाणिक पणा ठेवणे गरजेचे आहे.थंडगार पाण्याची योजना अमलात आणत असताना निविदा काढली त्यात पाण्या साठी किती लिटरची पाण्याची टाकी बसविणे गरजेचे आहे हे सुध्दा खूप महत्वाचे आहे.मग ती दोन हजार लिटर ची की पाच हजार लिटर पाण्याची टाकी बसविली हे सुध्दा प्रत्यक्ष कागद पत्र , निविदा आणि सद्या बसवलेली पाण्याची टाकी दोन हजाराची आहे की काय ? हे प्रत्यक्ष वस्तू पाहणे तितकेच गरजेचे आहे.म्हणूनच वाटते ग्रामपंचायतीचा जार तिथेही वाटतो भ्रष्टाचार ? असे त्यांच्या मनमानी कारभार पद्घतीने दिसते.गावातील आनंदी जार वाल्यांनी थंडगार पाण्याची योजना सुरू केली अहो त्यांनी लाखो रुपये खर्च करुन कर्ज काढून थंडगार पाण्याचा प्लांट उभा केला त्यांनी माणुसकी सोडली नाही.स्वतः घरी जार आणून देतात येकदा आणून दिलेला जार चार दिवस घरी पडून आहे तरी सुध्दा ते जार चे जादा पैसे लावत नाहीत घेतील तर ३० रुपये प्रमाणेच.मग यांचाच का बालहट्ट ही तर गोड बोलून हुकूमशाही राबविणे हाच काहीसा प्रकार या महाशयांनी चालवला हे योग्य नाही. विशेष म्हणजे वर्षभरातील किती ग्रामसभा प्रामाणिक पणाने घेतल्या गेल्या त्यांच सर्व फोटो ,व्हिडिओ यांनी दाखवण्यात हजर जबाबी पना ठेवला पाहिजे.ग्रामसभेत ठराव करावा की आपणास कोणती योजना राबवायची आहे ? त्याचप्रमाणे शासन दलीत वस्ती साठी भरभरून निधी देते मग दलीत वस्तीतीलच बौद्ध वस्तीत हायमास्ट लाईट लांबविले कुठे ? असला अन्याय यांनी मात्र करावा का ? असा संतप्त सवाल अन्याय अत्याचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेश उपाध्यक्ष भारतराज पवार यांनी केला असून सदर बौद्ध वस्तीत हाय मास्ट लाईट तात्काळ उपलब्ध करून द्यावे अशी मागणी पवार यांनी केली असून अन्यथा सर्वच बाबतीत संबंधित जिल्ह्यातील व राज्यातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडे चौकशी तक्रार अर्ज देण्यात येतील असेही पवार यांनी म्हटले आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here