देवळा येथे बुद्ध जयंती जल्लोषात साजरी
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क :मो.९१५८४१७१३१ देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : शांताराम पवार : देवळा येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी* आज बौद्ध पौर्णिमेनिमित्त देवळा येथे माता रमाई नगर येथील बौद्ध विहारात तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्ध पूजा व बुद्ध वंदना घेण्यात आली तसेच आनंद विद्यार्थी आश्रम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याला माननीय किशोर अहिरे सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले त्याप्रसंगी देवळा नगरपंचायतीचे नगरसेवक कैलासभाऊ पवार आरपीआयचे ज्येष्ठ नेते शांताराम पवार किशोर अहिरे सर रुपेश पवार सर कल्पेश पवार सर ईश्वर पवार सर केशव पवार किरण गांगुर्डे तुषार पवार टोनी पवार विकी पवार निशांत पवार ,सतीश पवार आदी बौद्ध उपासक याप्रसंगी उपस्थित होते!सायंकाळी माता रमाई नगर येथे बुद्ध पूजा घेऊन खिरदान करण्यात आले !याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रुपेश पवार सर यांनी केले!
