ब्रेस्ट कॅन्सर पडताळणी ॲम्बुलन्सचे लोकार्पण खा.गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते करून भव्य सत्कार सोहळा संपन्न

0
78

भारत पवार : मुख्य संपादक : संपूर्ण राज्यात नव्याने पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : मो.९१५८४१७१३१

मुंबई / बोरिवली :  कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : संजय बोर्डे : 

खा.गोपाळ शेट्टी यांनी नुकतेच बहु प्रतिष्ठित संसद रत्न पुरस्कार मिळविला आहे. उत्तर मुंबई आणि मुंबईतील अनेक संस्था आपल्या जनप्रतिनिधीचे सन्मान करताना समाज उपयोगी प्रकल्प खा.गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन आणि लोकार्पण करतात.
असाच एक भव्य सत्कार सोहळा आणि सामाजिक उपक्रम बोरिवली येथील सुप्रसिद्ध नाना पालकर स्मृति समिती आणि श्री मोरेश्वर सेवा संघ तर्फे आयोजित करण्यात आला. दिनांक १ मे महाराष्ट्र दिना निमित्त नाना पालकर स्मृती समितीला कोटक लाइफने दिलेल्या ब्रेस्ट कॅन्सर स्क्रिनिंग व्हॅनचा पश्र्चिम उपनगरातील सेवेचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा संसद रत्न पुरस्कार प्राप्त खासदार श्री गोपाळ शेट्टी ह्यांच्या हस्ते झाला. अशाप्रकारची स्पर्शविरहीत तपासणी होणारी अद्ययावत एक व्हॅन बंगलोरला असून दुसरी व्हॅन नाना पालकर स्मृति समिती कडे आहे. रक्षिता ह्या उपक्रमाअंतर्गत जास्तीत जास्त महिलांना ह्या अद्ययावत व्हॅनद्वारे तपासणीचा लाभ व्हावा यादृष्टीने नाना पालकर शिबिरांचे आयोजन करणार आहेत.
अद्ययावत व्हेन चे उद्घाटन केल्या नंतर खा.गोपाळ शेट्टी यांचे स्मृती चिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नाना पालकर स्मृति समितीचे अध्यक्ष डाॅक्टर श्रीकांत बडवे व कार्याध्यक्ष डाॅक्टर परेश नवलकर व श्री मोरेश्र्वर सेवा संघाचे कार्यवाहक प्रसाद कुळकर्णी उपस्थित होते.
खा. गोपाळ शेट्टी यांनी यावेळी संस्थेचे आभार व्यक्त केले तसेच अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून या पुढे कॅन्सर पडताळणी व्हेन मार्फत अधिक गरजू लोकांपर्यंत पोचता येईल असे समाधान ही व्यक्त केले. कोटक लाईफ ब्रेस्ट कॅन्सर स्क्रिनिंग व्हॅन चे उद्घाटन करून त्यातील पहिले शिबिर मंगळवार दिनांक २ मे रोजी एक्सर गावदेवी तलावाजवळ बोरीवली पश्र्चिम येथे झाले.
या कार्यक्रमांत मोठय संख्येने बोरिवलीतील नागरिक आणि नाना पालकर स्मृती समितीचे तसेच श्री मोरेश्वर सेवा संघाचे मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुगंधा देवधर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here