१२ तालुक्यांचे विभाजन, मालेगाव जिल्ह्याचे “लालगाजर” लोमकळले अप्पर तहसील कार्यालय सुरू होणार

0
171

भारत पवार : मुख्य संपादक : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.मो.९१५८४१७१३१                                    मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज नेटवर्क :भारत पवार / विलासराव गडाख :   राज्यातील १२ तालुक्यांचे  प्रशासकीय विभाजन होणार असल्याचे खात्रीशीर वृत्त असून मालेगाव जिल्हा करण्याचे गेल्या २५ ते ३० वर्षांचे मालेगावकरांचे स्वप्न अखेर लोंबकळत ठेवल्याने येथे नाराजी पसरली आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री भुसे यांनी याकामी जोर धरून जिल्हा करणार असल्याचे एके काळी मालेगावच्या जनतेस दिलेले आश्वासन सार्थकी लावावी अशी मागणी जनतेने केली असून हा आपल्या अस्मितेचा प्रश्न तर आहेच परंतु आपण मंत्रालयात महत्वाच्या पदावर नाशिक जिल्ह्याची धुरा सांभाळत आहात हा मोठा स्वाभिमान असून याचे महत्व मालेगाव जिल्हा करण्यात खर्ची करावे तर आपले सप्न पूर्ण होऊन जन्मास आल्याचे सार्थक होईल असेही येथील नागरिकांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.नाहीतर जनतेस दिलेले आश्वासन जिल्ह्याचे गाजर लोंबकळत ठेवल्यास आपल्यावर जनतेने विश्वास नेमका ठेवावा कसा ? असा सवाल ही जनतेतून केला जात आहे.राज्यातील १२ तालुक्यांचे प्रशासकीय विभाजन होणार असून सद्या
विद्यमान तहसील कार्यालयांवर कामांचा वाढता बोजा,अनेक दिवस कामे रखडणे व शासकीय योजनांच्या अंमलबजावणीस होत असलेला विलंब विचारात घेऊन राज्य सरकार राज्यातील बारा तालुक्यांचे लवकरच प्रशासकीय विभाजन करणार आहे.तालुक्यासाठी विद्यमान तहसीलदार असताना आता त्या ठिकाणी अप्पर तहसीलदार नियुक्त करून कामे आणि गावांचे वाटप केले जाणार आहे.अप्पर तहसीलदारांसाठी स्वतंत्र कार्यालय असेल.लातूर जिल्ह्यातील कासार शिरशी, रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर या अप्पर तहसील कार्यालयांना मंजुरी मिळाली आहे.या ठिकाणी पदनिर्मिती करण्यात येत आहे.सध्या तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांची पदे मंजूर करण्यात आली असून,इतर पदे जिल्हा अथवा तालुका महसूल कार्यालयातून वर्ग करण्यात येणार असल्याची माहितीही महसूल विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव आणि नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुका,धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग, औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अजिंठा,अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर तालुका,जळगाव जिल्ह्यातील जळगाव व चाळीसगाव तालुक्यातील मेहरबारी,जामनेर तालुक्यातील पहुर येथे, तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याबाबत प्रस्तावित आहे.जिल्हानिर्मिती लाल फितीत
नवीन जिल्ह्याच्या मागणीसंदर्भात मात्र अद्याप कोणतीही चर्चा सुरू नाही. नवीन जनगणना होत नाही, तोपर्यंत नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीबाबत विचार केला जाणार नाही,असे महसूल अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here