फसवणूक : ग्राहकांना चुना ,टीव्हीएस शो रूम मालक तोंड काळे करून फरार,लखमापूर मध्ये खळबळ पोलिसांना सुद्धा गंडा सटाणा पोलिसांची कसोटी ,लक्ष्मण कुवर यांचे आर टी ओ कार्यालयासमोर २६ जानेवारी रोजी प्राणांतीक उपोषण

0
72

भारत पवार : मुख्य संपादक : जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क : ९१५८४१७१३१
मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : सटाणा तालुक्यातील लखमापूर येथील “टीव्हीएस” शोरूमचे चालक यांनी गेल्या 13 महिन्यापासून रोख पैसे घेऊन वाहनधारकांची नोंदणी न केल्याबाबत त्रस्त झालेले वाहनधारक श्री. लक्ष्मण आनंदा कुवर रा. तळवाडे, ता. मालेगाव यांची मोठी फसवणूक केल्याबाबत त्यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, टेहरे  मालेगाव यांच्या कार्यालयासमोर दिनांक 26 जानेवारी 2023 पासून प्राणांतिक उपोषणास बसणार असल्याचे निवेदन  दिले . “राजनंदिनी” टीव्हीएस, साई टीव्ही एस फेस्टिवल मनमाड, आउटलेट लखमापूर ता. बागलाण जि. नाशिक यांनी रोख पैसे घेऊन सुद्धा अद्याप पावतो वाहनाची नोंदणी केली नाही. सदर शोरूम धारकाने फसवणूक करून शोरूम बंद करून परागंदा झालेला आहे. सदर शोरूम धारकाकडे अनेक वेळा चकरा मारून सुद्धा प्रतिसाद दिलेला नाही तसेच भ्रमणध्वनी सुद्धा बंद करून ठेवलेला आहे व शोरूम ला टाळे ठोकून ग्राहकांना चुना लाऊन तोंड काळे करून फरार झालेला आहे असे वेळोवेळी चक्र मारल्यावर निदर्शनास आल्यानंतर, याबाबत नाशिकचे पोलीस अधीक्षक (ग्रामीण), यांचेकडे तक्रार दाखल केली. त्यांनी तात्काळ कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश सटाणा पोलीस यांना दिले.
तथापि संबंधित सब डीलर व डीलर यांनी अद्याप पावतो गांभीर्यांनी लक्ष न दिल्याने दिनांक 9/ 1 /2023 रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मालेगाव यांना उपोषणाबाबत आगाऊ सूचना दिली. सदरची लखमापूर येथील शोरूम धारक हे टीव्हीएस चे शोरूम बंद करून फरार झालेले आहेत. त्यांनी या भागातील अनेक वाहनधारकांची फसवणूक केलेली आहे. बऱ्याच लोकांची रोख पैसे घेऊन सुद्धा काही फायनान्स कंपन्यांकडून स्वाक्षऱ्या करून अनेक जणांना अडचणीत आणलेलं आहे.
बऱ्याच जणांनी दहशती पोटी तक्रार दाखल केलेल्या नाहीत.
परंतु श्री. कुवर, यांनी मा.पोलीस अधीक्षक नाशिक( ग्रामीण) यांच्याकडे तक्रार केली, असता त्यांनी कलम 420 प्रमाणे सटाणा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेशित केले आहे.
यामध्ये परिसरातील अनेक वाहनधारकांना अशा प्रकारे फसवल्याचे विशेष म्हणजे काही पोलीस कर्मचारी यांना सुद्धा सदर शोरूम मालकाने फसवल्याचे दबक्या आवाजात चर्चा होत आहे.आता शो रूम मालकास शोधून काढणे हिच खरी कसोटी सटाणा पोलिसांची असून यात ते किती वेळात पास होणार हे पोलिसांच्याच हाती असून त्यास तात्काळ शोधून  त्याचेवर गुन्हा दाखल  करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.तर याबाबत संबंधित सब डीलर, डीलर यांचे एक वर्षापासूनचे सेल रजिस्टर, स्टॉक रजिस्टर, इन्व्हाईस रजिस्टर, विक्री झालेल्या गाड्यांची इंजिन नंबर, चेसी नंबर , व संबंधितांकडून सर्वच गाड्यांच्या कागदपत्र तपासण्याची मागणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मालेगाव, यांच्याकडे लेखी स्वरुपात करण्यात आलेली आहे.
संबंधित डीलर, सब डीलर, यांची चौकशी करण्याचे आदेश परिवहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. विनोद जाधव, यांनी दिले असून संबंधितांचे अकाउंट तात्काळ लॉक करून, संबंधितांवर त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करीत आहोत.असे श्री.जाधव, यांनी सांगितले.
तक्रारदार यांना त्यांच्या गाडीचे सर्व नोंदणी दस्तऐवज दिले जातील असे जाधव यांनी सांगितले.
प्रजासत्ताक दिनापासून आपण उपोषण करू नये, अशी विनंती केली आहे.
तसेच ज्या वाहनधारकांची फसवणूक झाली असेल त्यांनी रीतसर तक्रारी दाखल कराव्यात असेही श्री. जाधव साहेब यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here