उपोषण इफेक्ट: आमरण उपोषणाचा ४ था दिवस : माझ्या जिवाची होतेय काहीली…उपोषण कर्त्याची भेटच नाही घेतली , बिडीओ वेंदे यांच्या मनात शिजतात तरी कोणते कांदे ? पत्रकारांमध्ये संताप , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीपकुमार जाधव यांची उपोषण स्थळी तातडीची भेट _ मुख्य संपादक भारत पवार

0
69

भारत पवार : मुख्य संपादक – महाराष्ट्र न्यूज : आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती तसेच पत्रकार नियुक्ती साठी इच्छुकांनी संपर्क करावा : मो.९१५८४१७१३१

मालेगाव कॅम्प : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : युवा मराठा चे मुख्य संपादक संस्थापक राजेंद्र राऊत पाटील यांचा आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस उजाडला असून ह्या आमरण उपोषणाला अनेक पत्रकार ,शासकीय अधिकारी,राजकीय नेते भेटी देत आहेत मात्र मालेगाव पंचायत समितीचा मेढा ( प्रमुख) असतो अर्थात गटविकास अधिकारी वेंदे यांनी अद्याप उपोषण कर्त्याची भेट घेतली नसून उलट पाठ च फिरविल्याचे निदर्शनास आले आहे.आजची बातमी टाईप करे पर्यंत सुद्धा वेंदे यांनी उपोषण स्थळी भेट दिली नसून पत्रकारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. माझ्या जिवाची होतेय काहीली उपोषण कर्त्याची भेटच नाही घेतली ,बी डी ओ वेंदे यांच्या मनात शिजतात तरी कोणते कांदे असे म्हणून महाराष्ट्र न्यूज चे मुख्य संपादक संस्थापक तथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राज्य उपाध्यक्ष भारतराज पवार यांनी संताप व्यक्त केला असून ह्या घटने बाबत विभागीय महसूल आयुक्त व विभागीय उप आयुक्त ( ग्राम.) नाशिक तसेच जिल्हा अधिकारी आणि  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने दखल घ्यावी अशी मागणी भारतराज पवार यांनी मीडिया द्वारे केली आहे.

संपादक ,पत्रकार राजेंद्र पाटील राऊत यांचे त्यांच्या न्याय मागणी साठी आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून ह्या गंभीर घटनेची दखल मालेगाव कॅम्प विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी ( SDPO ) प्रदीपकुमार जाधव यांनी तातडीने घेत कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक राधाकृष्ण काळे आणि आठ पोलीस अंमलदार यांचेसह आमरण उपोषणकर्ते राजेंद्र राऊत पाटील यांची रात्री भेट घेत तब्येतीची विचारपूस करून सबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.मात्र हे प्रकरण ज्या विभागाशी शिजले गेले राऊत पाटील यांच्या बाबतचे सगळे पुरावे ज्यांच्या कार्यालयात उपलब्ध असून असे मालेगाव पंचायत समितीचे सर्वेसर्वा गटविकास अधिकारी वेंदे यांनी मात्र आजपावेतो पाठच फिरविल्याचे येथे संताप व्यक्त केला जात आहे.शासनाचा जी आर सांगतो की,अफरातफर करणारे,फसवणूक करणारे ग्रामसेवक असो की सरपंच असो त्यांचेवर कारवाई करण्याचे पोलिसात फिर्याद किंवा तक्रार दाखल करण्याचे काम अधिकार  गटविकास अधिकारी यांना आहेत असा शासनाचा जी आर आहे.तरी सुद्धा बिडीओ वेंदे यांच्या मनात कोणते शिजतात कांदे ? हा प्रश्न च असून कोणाच्या दबावाला भीक घालतात की काय ? असा संतापजनक सवाल संपादक पत्रकार राजेंद्र पाटील राऊत व भारतराज पवार यांनी यावेळी केला आहे.बिडीओ जरी त्यांच्या अधिकारी ,कर्मचाऱ्यांना राऊत पाटील यांच्या भेटीस पाठवत असतील तर ते सरळ म्हणतात आम्हास कारवाई करण्याचे किंवा ठोस योग्य निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत मग उपोषण कर्ते राऊत यांना भेटून साध्य काय करतात असा सवाल ही पवार यांनी केला आहे.जर बिडीओ चे कर्मचारी रविवारी २५ डिसेंबर ०२२ रोजी सर्वत्र सुट्टीचा दिवस असताना ग्रामपंचायत उघडुन त्याच तारखेचा लगबगीने उतारा राऊत यांना देण्यात धन्य मानतात मग काल रविवारी हेड कॉटर सोडून गटविकास अधिकारी होते कुठे ? उपोषणकर्त्यास भेट देण्यास त्यांना वेळ का नव्हता ? आमरण उपोषणाला बसले असताना सुद्धा हेड कॉटर सोडून बाहेर जाता येते का ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून याबवत उच्च स्तरीय अधिकाऱ्यांनी तातडीने स्वतः लक्ष घालून राजेंद्र राऊत पाटील यांना योग्य न्याय द्यावा या गंभीर बाबीचे तातडीने निराकरण करण्यात यावे अशी मागणी संपादक भारतराज पवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here