
भारत पवार : मुख्य संपादक : जाहिराती ,बातम्या आणि पत्रकार नियुक्ती साठी संपर्क करा.मो.९१५८४१७१३१
मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : सटाणा तालुक्यातील लखमापूर येथील टीव्हीएस शोरूम चे मालक ग्राहकांकडून रोख रक्कम घेऊन फरार झाला आहे.ह्या घटनेस १३ महिन्यांचा कालावधी झाल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळत होती.म्हणून आर.पी.कुवर रावसाहेब ( तात्या) यांचे बंधू लक्ष्मण कुवर यांनी येत्या २६ जानेवारी ०२३ रोजी प्राण्यांतीक उपोषण करण्याचा इशारा कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ह्या वेब चॅनल मधून दिला होता .याबाबत फसवणूक : ग्राहकांना चुना , टीव्हीएस शो रूम मालक तोंड काळे करून फरार ,लखमापूर मध्ये खळबळ,पोलिसांना सुद्धा गंडा ,सटाणा पोलिसांची कसोटी,लक्ष्मण कुवर यांची आर टी ओ कर्यालया समोर २६ जानेवारी रोजी प्राणांतिक उपोषण करणार ह्या मथळ्या खाली कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज मध्ये कालच बातमी प्रकाशित करण्यात आली होती.त्यामुळे लखमापूर गावासह संपूर्ण सटाणा तालुक्यात आणि पोलिसात सुद्धा जोरदार खळबळ माजली होती.ह्या बातमीची आर टी ओ मालेगाव यांनी तात्काळ दखल घेत सदर गाडीचे रजिस्ट्रेशन नोंदणी केले.आणि ग्राहकांना लगेचच तसे प्रमाणपत्र देण्यात आले.त्यामुळे ग्राहकांनी समाधान व्यक्त केले असून कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज तसेच आर टी ओ मालेगाव यांचे जाहीर आभार व्यक्त करून येत्या २६ जानेवारी ०२३ चे प्राणांतिक उपोषण मागे घेत असल्याचे लक्ष्मण कुवर व कुवर रावसाहेब ( तात्या ) ह्या बंधूंनी कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.गेल्या १३ महिन्यांपासून ग्राहकांकडून रोख पैसे उपटून टीव्हीएस शो रूम मालक फरार असून वाहन धारकांची नोंदणी न केल्याने ग्राहकांत संताप व्यक्त केला जात होता. राजनंदिनी टीव्हीएस , साई टीव्हीएस फेस्टिवल मनमाड आउटलेट लखमापूर यांनी लखमापूर ग्राहका कडून रोख रक्कम घेऊनही नोंदणी केलेली नव्हती.
