मटाने (देवळा) गावच्या ग्रामसेवकांनी डोके लावले, साथीच्या रोगांना आमंत्रण दिले !

0
53

 (मटाने गावातील बौद्ध विहाराजवळील बौद्ध रहिवाशांच्या  कायम ये जा करण्याच्या रस्त्यावर ग्रामसेवकांनी अर्धवट मुरूम टाकून पाऊसाचे पाणी साचून गाळ निर्माण झाल्याने भयानक परिस्थितीला रहिवाश्यांना सामना करावा लागत असल्याचे वरील छायाचित्रात दिसत आहे.) भारत पवार : मुख्य संपादक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज :” एक लाख + ” वाचक संख्या असलेल्या ” महाराष्ट्र न्यूज ” करीता पत्रकार नियुक्ती साठी तसेच जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.9158417131

देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : देवळा तालुक्यातील मटाने गावच्या ग्रामसेवकांनी चांगलेच डोके चालवले असून साथी सारख्या रोगांना आमंत्रण दिल्याचे स्पष्टपणे वरील छायाचित्रात दिसत असून म्हणतात ना अती शहाणे त्याचे बैल रिकामी ह्या म्हणीचा प्रत्यय मटाने गावच्या बौद्ध रहिवाशांना येत आहे.याबाबत ग्रामसेवक अनिल आहेर यांना रहिवाशांनी सांगून सुद्धा ग्रामसेवकांची बुद्धी गहाण ठेवल्या सारखीच ग्रामस्थांना जाणवत आहे.ते याबाबत गांभीर्याने घेत नसल्याने रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.याबाबत येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले की,गेल्या २५ ते ३० वर्षांपासून बौद्ध विहाराच्या डावीकडील बाजू कडून गावात ये जा करण्यासाठी नाल्यातून रस्ता होता आम्ही सर्वच बौद्ध बांधव ह्या रस्त्यातून गावात ये जा करत असतो परंतु सदर ग्रामसेवकांनी आमचा येण्या जाण्याचा विचार सोडाच परंतु आमच्या वास्तव्याचा सुद्धा विचार न करता ह्या नाल्याच्या अर्ध्या भागात मुरूम वजा माती टाकून अर्धा नाला बुजला आणि अर्धा नाला पूर्वी होता तसाच ठेवल्याने पाऊसाचे पाणी साचून चिखल मिश्रित गाळ निर्माण झाल्याने दुर्गंधीच्या श्वासात रहिवाश्यांना रहावे लागते तर ह्या रस्त्याने आमचे येणे जाणे सुद्धा बंद झाले आहे आणि अगदी बाजूलाच बौद्ध समाजाचे पवित्र असे बौद्ध विहार असून ह्या चिखल मिश्रित गाळ आणि दुर्गंधी मुळे बौद्ध विहाराची विटंबना झाल्याचे बोलले जात आहे तर रहिवाश्यांना साथीच्या रोगांना सामोरे जाण्याची भीती निर्माण झाली आहे.सदरच्या नाल्यात पेवर ब्लॉक ( गट्टू ) पर्यंत संपूर्ण मुरूम टाकून समांतर रस्ता करावा व रहिवाश्यांना दिलासा द्यावा अशी मागणी अडचणीचा सामना करत असलेअसलेल्या रहिवाश्यांनी केली असून याकामी चांदवड देवळ्याचे प्रांत अधिकारी सो.  देवळा तहसीलदार ,गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी प्राधान्याने लक्ष घालून वरील मागणी पूर्ण करावी अशीही मागणी रहिवाश्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here