रावळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी मुन्ना पवार तर उपसरपंचपदी भरत आखाडे यांची नियुक्ती ,रावळगावी आली आनंदाची भरती

0
20

रावळगाव : क स मा दे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज” मीडिया नेटवर्क _ वनिता सोनवणे यांचे कडून _मालेगाव तालुक्यातील रावळगाव ग्रामपंचायतीची निवडणूक यावर्षी अत्यंत चुरशीची पार पडली संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष रावळगाव ग्रामपंचायतीच्या निकालाकडे लागले होते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे आखाडे कुटुंबातील चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आणि आखाडे परिवारातील चारही उमेदवार निवडणुकीत विजय झाल्याने संपूर्ण मालेगाव तालुक्यात कुतूहलाचा विषय ठरला आणि आखाडे कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव बरसत राहिला. हा अभिनंदनाचा वर्षाव आखाडे परिवाराने कायम ठेवला असून नुकत्याच झालेल्या सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंच पदी मुन्ना पवार तर उपसरपंचपदी भरत आखाडे यांची नियुक्ती झाल्याने रावळगाव आणि पंचक्रोशीत आनंद पसरला असून रावळगावी आनंदाची भरती आली आहे. त्यामुळे पवार आणि आखाडे कुटुंबियांवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव केला जात असून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या जात आहेत तर महाराष्ट्र न्यूज चे मुख्य संपादक भारत पवार आणि पत्रकार वनिता सोनवणे यांनी व्यक्तिशः सरपंच मुन्ना पवार आणि उपसरपंच भरत आखाडे यांना शुभेच्छा दिल्या असून त्यांचे स्वागतही केले आहे.

पाहिजेत _ अल्पावधीत महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्‍यात घराघरात पोहोचलेले आणि वाचकांच्या मनावर ठसा उमटविणारे” महाराष्ट्र न्यूज ” साठी पत्रकार आणि संपादकांच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात येत आहे तरी पत्रकारितेत आपले नाव उज्ज्वल करण्यासाठी व जनसंपर्क असणाऱ्यांनी तात्काळ संपर्क करावा, तसेच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा.संपर्क : भारत पवार, मुख्य संपादक ,महाराष्ट्र न्यूज, मो.9158417131 आणि प्रतिनिधी/ पत्रकार – वनिता सोनवणे ,रावळगाव – मालेगाव.मो.9860541521

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here