Home Breaking रावळगाव सरपंचपदी मुन्ना पवार तर उपसरपंचपदी भरता खाडे यांची नियुक्ती रावळगावी आली...

रावळगाव सरपंचपदी मुन्ना पवार तर उपसरपंचपदी भरता खाडे यांची नियुक्ती रावळगावी आली आनंदाची भरती

0
75

रावळगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : वनिता सोनवणे _ यांच्या कडून _ मालेगाव तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या रावळगाव ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची पार पडली होती.ह्या निवडणुकीत एकाच कुटुंबातील अर्थात आखाडे परिवारातील चार सदस्य निवडून आलेत त्यामुळे संपूर्ण मालेगाव तालुक्यात चर्चेचा विषय ठरला. आखाडे कुटुंबीयांचे सर्वत्र कुतूहलाचा विषय असून त्यांचे अभिनंदनही केले जात आहे .नुकत्याच पार पडलेल्या सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडणुकीत रावळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी मुन्ना पवार तर उपसरपंचपदी आखाडे घराण्यातील भरत आखाडे यांची नियुक्ती करण्यात आल्याने रावळगाव पंचक्रोशीत आनंदाची भरती आली आहे .आखाडे आणि पवार कुटुंबीयांचे सर्वत्र जोरदार अभिनंदन केले जात असून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या जात आहेत तर संपादक भारत पवार आणि रावळगाव चे प्रतिनिधी पत्रकार वनिता सोनवणे यांनी सरपंच आणि उपसरपंच यांना व्यक्तिशः शुभेच्छा दिल्या आहेत.

पाहिजेत _अल्पावधीत महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात घरा घरात पोहोचलेल्या आणि प्रत्येक वाचकाच्या मनात ठसा उमटविणाऱ्या कसमादे टाईम “महाराष्ट्र न्यूज “साठी पत्रकार आणि संपादकांच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात येत आहे ,पत्रकारितेत आपले नाव उज्ज्वल करण्यासाठी जनसंपर्क भरपूर असणाऱ्यांनी तात्काळ संपर्क करावा .तसेच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करावा. संपर्क : भारत पवार , मुख्य संपादक “महाराष्ट्र न्यूज ” ,मो.9158417131,वनिता सोनवणे ,पत्रकार , रावळगाव आणि मालेगाव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here