भारत पवार : राज्य मुख्यसंपादक : ९१५८४१७१३१
देवळा : क.टा.महाराष्ट्र न्यूज : ऑनलाइन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : वाखारी-खर्डे जि.प.गटात कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे लोकप्रिय लोकप्रतिनिधी श्री सुनिल(गोटू आबा)आहेर यांच्या कार्यपद्धतीची प्रचिती देवळा शहरात बघावयास मिळाली, देवळा शहरातून राष्ट्रीय महामार्ग जातो त्याचे काँक्रिटीकरणाचे काम अनेक महिन्यांन पासून पूर्ण झाले आहे परंतु शहरातील जुन्या तहसील कार्यालया समोरून शहरात व्यापारी पेठेत जाणाऱ्या प्रवेशद्वारावर हॉटेल श्रीनिवास जवळ रस्त्याच्या कडेला रस्ते बनविणाऱ्या संबंधित कंपनीकडून सर्विस रोड न करता मातीचे ढिगारे,उंच सखल रस्ता जसेच्या तसे अनेक महिन्यांपासून तसेच सोडले आहेत कोणीही त्याची दखल घेत नाही या ठिकाणी ट्रॅफिक जाम होणे, छोटे मोठे अपघात होणे नित्याचेच आहे नुकतेच सुनिल गोटूआबा आहेर यांचे मोठे बंधू बापू यांची नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीत नगरसेवक पदी बिनविरोध निवड झाली हा संदर्भ देत येथील स्थानिक व्यावसायिकांनी या समस्येकडे गोटू आबांचे लक्ष वेधले त्यांनी तात्काळ क्षणाचाही विलंब न लावता स्वखर्चाने जेसीबी ला पाचारण केले, स्वतः वाहतूक नियंत्रित करून जेसीबी चालकास सूचना देऊन रस्ता सपाट करून व्यवस्थित करून घेतला त्यामुळे भविष्यातील घडणाऱ्या अनेक अपघातांपासून नागरिकांना आणि वाहतूकदारांना वाचवून होणारे मरण टाळले असल्याची जोरदार चर्चा देवळा शहरातील आणि परिसरातील नागरिकात होत आहे. या घटनेवरून परिसरातील नागरिक कुजबुजत होते की म्हणूनच गोटूआबा यांना ग्रामिण भागातील जनता कार्यसम्राट लोकप्रतिनिधी म्हणते तर….





