भारत पवार : राज्य मुख्यसंपादक : ९१५८४१७१३१. ब्राम्हणगाव : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : सटाणा तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील कु. रोहन विनायक खरे यांची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल गावात जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.
खरे कुटुंबात जन्म घेतलेल्या रोहनने मोठ्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढत पुढे आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अतिशय कठीण परिश्रम करून हे यश संपादन केले. तो रात्रंदिवस मिळेल त्या वेळात व्यायाम व मेहनत करून या भारतीय सैन्यदलात निवड होण्यासाठी परिश्रम घेत होता. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने रोहन खूपच मेहनत करत होता. वडील विनायक खरे

हे सर्वसामान्य कुटुंबातील असून ते शेती व्यवसाय करतात.मुलाची सैन्यदलात जाऊन देशसेवा करण्याची त्यांची इच्छा होती हे त्यांनी जाणून त्याच्या प्रयत्नांना त्यांनी पूर्णपणे पाठबळ दिले.
कु.रोहन याची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याची खबर ब्राह्मणगाव येथे वाऱ्यासारखी पसरताच गावातील त्याचे सर्व मित्र परिवार नातेवाईक,नागरिक यांनी त्याची वाजत गाजत मिरवणूक काढून त्याचे अभिनंदन केले.
गावच्या या तरुणाने गावाची शान राखल्याबद्दल ब्राह्मणगाव चे सरपंच किरण अहिरे, उपसरपंच बापूराज खरे व अन्य मान्यवरांनी त्याचे गावच्या वतीने ग्रामपालिकेच्या सभागृहात भव्य सत्कार करून त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.
रोहन च्या या निवडीबद्दल गावात व पंचक्रोशीत त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर
आजच्या तरुण पिढीला रोहनचे देशसेवेसाठी निवड होणे एक आदर्श उदाहरण ठरले असून गावातील तरुणांनी हा आदर्श घेऊन पुढे येऊन देशसेवेसाठी सैन्य दलात दाखल होण्याची गरज असल्याचे यानिमित्ताने सरपंच किरण अहिरे व उपसरपंच बापूराज खरे यांनी सत्कारा प्रसंगी बोलतांना गावातील युवकांना आवाहन केले.





