तरंगत नसतो आम्ही कुठल्याही लाटेवर …!आम्ही चालतो फक्त शिवछत्रपतींच्या वाटेवर…!!

0
12

 

पुणे : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : नेटवर्क _ बुधवारी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून शिवजयंती संदर्भात एक परिपञक काढण्यात आले या परिपञकामध्ये कोरोणाच्या पार्श्वभूमीमुळे शिवजयंती फक्त दहा लोकांना एकञ येऊन करावी असे नमुद करण्यात आले.मुख्यमंत्री साहेब आम्ही शिवभक्त वर्षाचे 365 दिवस 19 फेब्रुवारी म्हणजे..छञपती शिवराय महाराज यांच्या जयंतीची वाट पाहत असतो.. आणी ‘शिवजयंती’ हा आमचा राष्ट्रीय सण आहे. आणी आम्ही धुमधडाक्यात साजरा करतोत…
मुख्यमंत्री साहेब कोरोना ची पार्श्वभूमी असताना..पदवीधर व ग्रामपंचायतीच्या निवडणुका जोरात झाल्या..बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारायला हजारो लोक एकत्र आले शरद पवार आझाद मैदानात हजारो लोकांचे मेळावे घेतले,वीज बिला विरोधात बीजेपीचे राजकीय नेत्यानी आंदोलन केले,बाळासाहेब थोरात ट्रेक्टर रैली काढली इंधन दरवाढ बाबत आंदोलन केले,एल्गार परिषदेला परवानगी मिळाली..
मग आम्हांला शिवशक्तांना सांगा मुख्यमंत्री साहेब कि,

छञपती शिवाजी महाराजांची शिवजयंती केल्यावर मात्र कोरोना होतो म्हणे खरं आहे का..।
आज काँग्रेसचा मोठा पदग्रहन मेळावा झाला,उपमुख्यमंत्र्याचा भव्य शेतकरी मेळावा झाला,मग मुख्यमंत्री साहेब आम्हा शिवशक्तांना तुम्ही सांगा कि..,
शिवजयंती बद्दल इतका द्वेष का ?
मुख्यमंत्री साहेब बसमध्ये ५०-६० लोकांना कोंबता..! शिवजयंतीला मात्र १० लोक..! तिथीचे अट्टाहासासाठी शिवजयंती उत्सव धोक्यात.खुद्द शिवरायांचे सैनिक म्हणवून घेणाऱ्या नेते मंडळीसाठी गर्दी चालते,मात्र छत्रपती शिवराय यांचे जयंती निमित्त गर्दी चालत नाही म्हणे शिवजयंती हा फक्त अठरापगड जाती-जमातीच्या रयतेचा लोकोत्सव नसून त्यांचा तो मूलभूत अधिकार आहे…
तरंगत नसतो आम्ही कुठल्याही लाटेवर…
आम्ही चालतो फक्त ‘शिवछत्रपतींच्या’ वाटेवर…!
मुख्यमंत्री साहेब शिवजयंती साजरी होणारच ती पण मोठ्या प्रमाणातच..
शिवराय मना-मनात
शिवजयंती घरा-घरात..                                                                जााा
लेेेखक _ संतोष बादाडे ,
शिवभक्त .

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या,जाहिराती साठी संपर्क करावा तसेच पत्रकार आणि संपादकांच्या विविध जागांसाठी नियुक्ती करण्यात येत आहे.संपर्क : भारत पवार , मुख्य संपादक ,महाराष्ट्र न्यूज .मो.9158417131

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here