देवळा येथे रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन संपन्न आरटीओ किरण बिडकर यांनी केलेले मार्गदर्शन
1 min read
वासोळ – क स मा दे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज “_ प्रतिनिधी _

मालेगाव उपप्रादेशिक परिवहन विभागाचे परिवहन अधिकारी किरण बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव परिवहन विभागात रस्ता सुरक्षाह्ण अभियानाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्ताने देवळा बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी किरण बिडकर यांनी उपस्थित वाहन चालकांना व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. बाजार समितीच्या आवारात कांदा विक्रीसाठी आलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलींना रिफ्लेक्टर तसेच वाहन दिशादर्शक फलक लावण्यात आले. या वेळी मोटार वाहन निरीक्षक नरेंद्र जाधव, अतुल सूर्यवंशी, देवळा बाजार समितीचे उपसभापती रमेश मेतकर, संचालक जगदीश पवार, प्रदीप आहेर, काकाजी शिंदे, कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश कोठावदे, कांदा व्यापारी अमोल आहेर, अनिल पगार, सचिव माणिक निकम, डॉ. राजेंद्र गुंजाळ, वाजगावचे उपसरपंच बापू देवरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
* महत्वाचे _ महाराष्ट्रातील घराघरातील वाचकांच्या मनामनात ठाण मांडून राज्यातील घराघरात पोहोचलेले समस्त वाचकांनी पसंत केलेल्या कसमादे टाईम्स” महाराष्ट्र न्यूज” साठी तुमच्या परिसरातील घडणाऱ्या घडामोडी, बातम्या आणि जाहिरातीसाठी लगेच संपर्क करावा ,तसेच महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी व तालुक्यातील गावागावात पत्रकार आणि संपादकांच्या विविध पदावर नियुक्ती करणे आहे जनसंपर्क व राजकीय नेत्यांशी संपर्क असणाऱ्यांनी आणि लिखाणाची आवड असणाऱ्यांनी तात्काळ संपर्क करावा. संपर्क _भारत पवार मुख्य संपादक” महाराष्ट्र न्यूज.” मो. 9158417131