सटाणा पोलिसांनी वंचित पदाधिकाऱ्यांचा घेतला धसका ,म्हणून चक्क पोलीस निरीक्षकांनी लावला म्हास्का ,आंदोलन करून करू नका हो आमचा पचका ..!

0
15

राज्यपालांच्या दौऱ्यावेळी केले जाणारे आंदोलनामुळे वंचितच्या  पदाधिकाऱ्यांना सटाणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचे कडून नोटीस  जारी .

सटाणा (नाशिक) : _ क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” _ प्रतिनिधी _
सटाणा शहरातील नागरीकांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या विविध प्रश्नांवर आजवर वंचित बहुजन आघाडी कायमस्वरुपी आवाज उठवित आहे.
शहरातील सांडपाण्याचा प्रश्न, अनु. जाती, अनु. जमाती, दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांमधिल नियमितता, सिद्धार्थ नगर परिसरात असणाऱ्या शौचालयांमुळे तेथिल नागरीकांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम, शहरात आवश्यक असणारी अभ्यासिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकुलातील अतिक्रमण, डुकरं-कुत्रे-मोकाट जनावरांचा उपद्रव आदी विषयांसाठी सटाणा नगर पालिका प्रशासनास वेळोवेळी निवेदन दिले. मात्र सुस्त असलेल्या प्रशासनास नागरीकांच्या विषयावर काहीएक देणं-घेणं नाही.
याकारणास्तव दि. ०३ फेब्रू, २०२१ रोजीच्या महामहीम राज्यपाल महोदयांच्या दौऱ्याप्रसंगी शहरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतिने सत्याग्रह करण्याचे ठरविले होते.
दरम्यान प्रशासनाने धसका घेतल्याने आंदोलनाच्या पुर्वसंध्येला प्रशासनाने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ता प्रा. अमोल बाळासाहेब बच्छाव, तालुकाध्यक्ष शेखर बच्छाव, तालुका महासचिव दादा खरे यांना प्रशासनातर्फे ‘क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम १४९ प्रमाणे’ नोटीस जारी करण्यात आली आहे.
अशापद्धतीने कितीही मुस्कटदाबी होत राहीली तरी, नागरीकांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचे आम्ही कधीही थांबविणार नाही. लोकहितासाठी कायमस्वरुपी सक्रीय राहू. अशी तीव्र प्रतिक्रिया जिल्हा प्रवक्ते अमोल बच्छाव यांनी दिली.

* महत्वाचे _ महाराष्ट्रातील घराघरातील वाचकांच्या मनामनात ठाण मांडून आणि घराघरात पोहोचलेले व महाराष्ट्र राज्यातील समस्त वाचकांनी” पसंत ” केलेल्या कसमादे टाईम्स” महाराष्ट्र न्यूज “साठी बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क करावा .तसेच महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी व तालुक्यातील गावागावात पत्रकार तसेच संपादकांच्या विविध पदांवर नियुक्ती करणे आहे, राजकीय तसेच जनसंपर्क भरपूर असणाऱ्यांनी व पत्रकारितेची आणि लेखनाची आवड असणाऱ्यांनी शीघ्र संपर्क करावा ,_संपर्क भारत पवार ,मुख्य संपादक “महाराष्ट्र न्यूज “मो.9158417131

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here