मालेगाव : दि.30. क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “_मीडिया नेटवर्क _ भारत पवार ,यांचे कडून _ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगर पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना शिस्तीचे धडे बदलून गेलेल्या आयुक्तांनी सुद्धा दिलेत.फरक काहीही पडत नाही.महिने दोन महिने त्यांच्यावर शिस्तीचा प्रभाव जाणतो आणि मग आयुक्त आपलेच आहेत अशा आविर्भावात हे अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा आरामात येतात , फिरतात.आणि दुपारी लंच टाईम झाला मग कोण कधी येणार हे त्यांनाच कळत नाही.सन २००१ मध्ये मालेगाव महानगर पालिका स्थापन झाली त्यावेळी प्रथम आयुक्त हर्षदीप कांबळे ( IAS ) नव्याने मालिका महानगरपालिकेत दाखल झाले होते त्यावेळी त्यांनी अधिकारी कर्मचारी यांच्यावर शिस्तीचा बडगा उगारला होता तो इतका भयानक होता की अधिकारीच काय तर नगरसेवक ,महापौर यांनीसुद्धा धसका घेतला होता तसेच युनियनचे पदाधिकारी कोणीही असो जर युनियन अथवा संघटना अधिकृत रजिस्ट्रेशन केलेले असेल तरच मला भेटण्यास एक किंवा दोन पदाधिकाऱ्यांनी यावे तेही मोजक्या शब्दात काही मिनिटातच बोलून निरोप घ्यावा अशी त्यांची शिस्त होती. त्यामुळे भल्याभल्यांचे धाबे दणाणले होते.अशा आयुक्तांची आज खरी गरज आहे.आयुक्त त्र्यंबक कासार यांनी काल जो अचानक मध्ये भयानक पायंडा घातला त्याचे मालेगाव महानगर मधील जागृत नागरिकांनी स्वागत केले असून आयुक्तांनी आपण असे पर्यंत तरी हा पायंडा कायम स्वरुपी ठेऊन नुसते कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे पुरता मर्यादित न ठेवता आपण स्वतः प्रत्येक प्रभागात, वार्डात जाऊन तेथील प्रभाग अधिकारी,स्वच्छता निरीक्षक,मुकादम ( हजेरी मास्टर) यांची हजेरी बुक ,चेक करून प्रत्यक्ष कामावर , हद्दीवर झाडू कामगार( महिला),गटार कामगार ( पुरुष ) किती वाजेपर्यंत काम करतात हे तपासणे गरजेचे आहे.अनेकदा सकाळी कामावर गेलेले महिला / पुरुष दहा वाजेच्या दरम्यान घरी पलायन करत असतात ते दुसऱ्या दिवशीच हजर होतात कारण मुकादम हा मॅनेज केला जातो अशी चर्चा होते.या साठी सकाळी ७.०० वा. ते दू.१२.१५ वा. ते 3.00. वा.उपायुक्त दर्जाचे प्रत्येक प्रभागा ४ अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करावे. आणि या पथकांचा वेळोवेळी आपल्या मनाप्रमाणे आणि सवडीप्रमाणे आयुक्त साहेबांनी प्रत्येक प्रभागात भेट देऊन पथकाकडून घोषवारा घ्यावा.म्हणजेच प्रभागातील सर्वच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना वेळेचे बंधन कळेल शिस्त लागेल प्रभागातील स्वच्छता नियमित टिकून राहील अशी अपेक्षा मालेगाव महानगरातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. कारण आजपावेतो अनेक आयुक्तांनी वेळेचे बंधन घातले तरी यरे माझ्या मागल्या अशी जीर्ण अवस्था अधिकारी आणि कर्मचारी यांची आहे.एकेकाळच्या महान कवित्री बहिणाबाई चौधरी यांनी मुक्या जनावरास “वडाळ “अशी उपमा दिलेली आहे त्या कवितेच्या ओळी आज आठवल्या शिवाय राहत नाहीत त्या म्हणतात, ” किती हाकला ,हाकला फिरुनी येती पिकावर “त्या मुक्या वासरास किंवा गाई, बैलास पिकापासून किती हाकलं तरी ते फिरून पिकावर धाड मारतच म्हणजे पीक खातच तसाच प्रकार मालेगाव महानगरपालिकेच्या बेपर्वाईने राहणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कितीही वेळेचे बंधन घातले कितीही व्यसन घातले किती हाकला हाकला फिरुनी येती उशीर असा हा त्यांचा “वडाळ “पणा सहज जाणे शक्य नाही त्यामुळे आदरणीय आयुक्त कासार साहेबांनी आता मागे वळून न पाहता पुढे चालत राहून शिस्तीचा बडगा कायम ठेवावा अशी अपेक्षा जागृत नागरिकांनी व्यक्त केली आहे काल शुक्रवारी आयुक्तांनी महानगरपालिकेच्या मध्ये स्थान बद्ध होऊन उशिरा येणाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागतच केले तरीसुद्धा त्यांच्या तोंडावर बारा वाजलेले दिसत होते जवळ-जवळ 55 कर्मचारी आणि अधिकारी यांना गुलाब पुष्प देऊन उशिरा येण्याचे मानकरी ठरविले आणि अशा मानकर यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा तात्काळ निर्णय आयुक्तांनी आस्थापना विभागास दिला. महानगरपालिकेची वेळ सकाळी नऊ पंचेचाळीस वाजता तर सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत आहे.शासनाच्या निर्णयानुसार पाच दिवसांचा आठवडा गृहीत धरून शनिवार आणि रविवार हे बहाद्दर सुट्टीवर असून सुद्धा सोमवार ते शुक्रवार वेळेचे भान न ठेवता उशिरा येणे आणि शक्यतो लवकर जाणेच पसंत करतात त्यामुळे किती हाकला हाकला….. असा प्रसंग संबंधित अधिकारी आणि कर्मचारी तसेच प्रभागातील प्रभाग अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक मुकादम त्याचप्रमाणे गटार कामगार झाडू कामगार आदींना वेळेचे बंधन घालने गरजेचे असून तेवढ्याच प्रमाणात त्याचे भान ठेवून कामाचे नियोजन केले गेले तर स्वच्छ मालेगाव हरित मालेगाव आणि सुंदर मालेगाव दिसण्यास वेळ लागणार नाही अशी अपेक्षा अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे.




