आर.पी.कुंवर ,नायब तहसीलदार ( सेवानिवृत्त ) / सामाजिक कार्यकर्ते ,मालेगाव ( नाशिक)
मालेगाव _दि.२९ . क स मा दे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज “_ विशेष प्रतिनिधी _ राज्यातील समस्त शेतकऱ्यांचा आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा सुद्धा फायदा कसा होईल याचा गाढा अभ्यास करून महाराष्ट्र शासनाने कब्जे हक्काने किंवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या भोगवटादार वर्ग दोन जमिनींच्या वर्ग-1 जमीन मध्ये रूपांतर करण्यावरील स्थगिती उठविण्यात यावी यासाठी गेल्या दीड-दोन वर्षांपासून मालेगावचे सेवानिवृत्त नायब तहसीलदार तथा सामाजिक कार्यकर्ते आर.पी.कुंवर ( रघुनाथ कुंवर) यांनी शासन दरबारी विशेष म्हणजे स्वखर्चाने सातत्याने पाठपुरावा करून आपला लढा अखेर यशस्वी केला.आणि दि.१०/१२/२०१९ रोजी दिलेला स्थगितीआदेश महाराष्ट्र शासनाने उठवला यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचा फायदा होणार असून वर्षानुवर्ष रेंगाळलेली कामे मार्गी लागतील त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाला नजराणा शासन तिजोरीत भर पडणार ती कशी ? याबाबत सविस्तर माहिती कुंवर यांनी मुख्यमंत्री,महसूल मंत्री,कृषी मंत्री यांना पटवून दिली. त्यामुळेच स्थगिती आदेश शासनाने उठविला आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश महसूल विभागाने राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. स्वखर्चाने का होईना माझ्या पाठपुराव्याने यश आल्यामुळे माननीय नामदार उद्धवजी ठाकरे साहेब ,मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ,माननीय बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री, माननीय दादासाहेब भुसे ,कृषी मंत्री ,महाराष्ट्र शासन यांचे मी महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर आभार मानतो. असे आर .पी.कुवर , यांनी कसमादे टाइम्सच्या” महाराष्ट्र न्यूज “वेब चॅनलशी बोलतांना सांगितले.
