मालेगाव येथील आयुक्तांनी कर्तव्य बजावले : ” महाराष्ट्र न्यूज ” ची खरी ठरली फाईट , अधिकारी व कर्मचारी यांचे वातावरण केले टाईट …! मालेगाव मनपा आयुक्त कासार यांनी घेतली क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” च्या बातमीची दखल ,समाज मंदिराचे काम निकृष्ट व अर्धवट सोडून डल्ला मरणाऱ्यास काळ्या यादीत टाका _ भारत पवार
1 min read
त्रंबक कासार ( आयुक्त मनपा मालेगाव )

मालेगाव : क स मा दे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज “_ भारत पवार _ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील मनपा आयुक्त त्र्यंबक कासार यांनी बातमीची तात्काळ दखल घेत संबंधित अधिकारी,कर्मचारी यांना कानमंत्र देत कॅम्प विभागातील हिम्मत नगर रोड लगत असलेल्या प्रकाश हौसिंग सोसायटी आणि देवी मंदिर जवळ असलेली दुर्गंधी युक्त घाण तात्काळ उचलण्याचे आदेश दिले असले तरी हे तात्काळ असलेले आदेश तात्काळ काही काळाचे न ठरता कायम साठी ठेऊन असलेली घाण रोजच्या रोज उचलण्यात जावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.” मालेगाव महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जी पना , रहिवाशांनो घानीस बळकटी आना फक्त दर महा आम्हास पगार …. ” ह्या मथळ्या खाली क स मा दे टाइम्स”महाराष्ट्र न्यूज ” वेब चॅनल मधून मा. भारत पवार यांनी सदर भागातील गलिच्छ व दुर्गंधी बद्दल वृत्त छापले होते.सदर वृत्ताची तातडीने दखल मालेगावचे आयुक्त मा. कासार यांनी घेत संबंधित अधिकारी यांना आदेश केले आणि तातडीने काल ( बुधवारी) सानेगुरुजी नगर,प्रकाश हौसिंग सोसायटी,पंचशील नगर व इतर वार्ड मधील गलिच्छ कचरा उचलण्यात आला.परंतु प्रकाश हौसिंग सोसायटी,सानेगुरुजी नगर,पंचशील नगर येथील शौचालय ( मुतारी ) मात्र स्वच्छ झाल्या नाहीतच त्यांची दुर्गंधी मात्र नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आहेच मात्र आयुक्तांनी आदेश करूनही जर स्वच्छता केली जात नसेल तर अशा बेजबाबदार , कामचुकार अधिकारी स्वच्छता निरीक्षक,मुकादम यांचेवर कार्यवाही का केली जात नाही ?असा प्रश्न यावेळी जनतेस चर्चिला जात आहे तसेच गटार साफ करते वेळी किवा कचरा, घाण उचलते वेळी वरील अधिकारी सफाई कर्मचारी मागे उभे राहून काम करतच नाही असाही आरोप जनतेने केला असून रोज साफ सफाई करून घाण रोजच्या रोज उचलण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. आयुक्तांनी घाण,कचरा उचलण्याचा व साफ सफाई करण्याचा आदेश हा केवळ फार्स न ठरता तो कायम साठी अर्थात रोजच्या साठी असावा तर स्वच्छ आणि सुंदर प्रकाश हौसिंग सोसायटी , सानेगुरुजी नगर , पंचशील नगर म्हणता येईल असेही स्थानिक नागरिकांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले. यात आयुक्तांनी आपल्या कर्तव्यात सत्यता ठेऊन कुनासही न घाबरता वरील भागातील ,वार्डातील स्वच्छता कायम स्वरुपी राबवावी आणि मुतारी( शौचालय) यांचा प्रश्न स्वच्छते बाबत गंभीर असून तो प्रश्न कायम स्वरुपी सोडवावा. तसेच प्रकाश हौसिंग सोसायटी लगत असलेल्या नियोजित ” फुले शाहू आंबेडकर ” समाज मंदिराचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू होते तीन वर्षात दोन वेळा स्लॅप कोसळला होता आणि आता ते काम खूप अर्धवट सोडून बंद पाडले आहे.असे समजते की सध्या बंद असलेल्या समाज मंदिराचे बिल मंजूर करून संबंधित ठेकेदार देण्यात आल्याचे सांगण्यात येते ? याची चौकशी उच्च स्तरीय चौकशी करून बिल जर दिले गेले असेल तर संबधितांविरुद्ध कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा व आजही काम बंद का करण्यात आले ? गेल्या तीन वर्षांपासून काम पूर्ण का केले गेले नाही ? सद्या केलेले अर्धवट काम सुद्धा निकृष्ट दर्जाचे असून त्याची तज्ञांमार्फत कामाच्या दर्जाची चौकशी करण्यात यावी व सबंधित ” उपटसुंभ ” ठेकेदार विरूद्ध गुन्हा दाखल करून त्यास काळ्या ( ब्लॅक) यादीत टाकण्यात यावे .कुणाची मुलही जा न करता निःपक्षपाती पने चौकशी करून समाज मंदिराचे कामात डल्ला मारून समाजास वेठीस धरणाऱ्या त्या कलंकित ठेकेदार विरूद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी संपादक तथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि माहिती अधिकार का.महासंघाचे कार्याध्क्ष भारत पवार यांनी प्रसिध्दी माध्यमाद्वारे कर्तव्य दक्ष आयुक्त मा. त्र्यंबक कासार यांचे कडे केली आहे.