शहादा_(नंदुरबार ) दि.23 : क स मा दे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज ” मोहिते _ यांचे कडून _
– नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण असलेले तोरणमाळ, सातपुडाच्या सहाव्या रांगेतील खडकी गाव खोल दरीत आहे.तेथे जाण्यासाठी नुकताच तोरणमाळ ते खडकी हा घाट रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याचे अद्यापही ठीक-ठिकाणी काम बाकी आहे.सकाळी तोरणमाळ कडे मजूर घेऊन येणारे वाहनाच्या चालकाचे नियंत्रण तिव्र चढाव आणि वळणावर रस्त्यावर सुटले.त्यामुळे वाहन थेट 500 फूट खोल दरीत जीप कोसळल्याची भीषण घटना घडली.या घटनेत सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असून जीप मध्ये आणखी मजूर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.जीपमध्ये 20 पेक्षा अधिक मजूर असल्याची माहिती समोर येत आहे.500 फूट दरीत जीप कोसळल्याने मदत कार्यकरण्यास अडचणी येत आहेत. तरी स्थानिक रहिवासी,म्हसावद पोलीस व वनविभाग कर्मचाऱ्यांच्या मदतीने गंभीर जखमींना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
