ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा,कळवा प्रमाणेच मालेगाव शहरात गृह प्रकल्प राबवून आपत्कालीन परिस्थितीतून मालेगावच्या जनतेची सुटका करावी _ आर.पी.कुंवर

0
79

मालेगाव : दि.23. क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” साठी रघुनाथ कुंवर _  महाराष्ट्रातील नासिक जिल्ह्यातील मालेगाव शहराची लोकसंख्या सुमारे आठ लाखाच्या आसपास असून तालुका स्तरातील घनदाट लोकसंख्येचे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे.शहरात पॉवर लुम ( हातमाग) धारकांची अर्थात कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.शासनाने आणि येथील मनपा ने म्हाळदे शिवारात घरकुल योजना राबविली असून शहरापासून खूपच दूर अंतरावर असल्यामुळे नागरी सुविधा अत्यंत कमी प्रमाणात असून रहिवासी तेथे जाण्यासाठी अत्यंत नाराज झाले आहेत त्यामुळे शहरातील नागरी वस्त्यांमध्ये च जर ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा आणि कळवा प्रमाणेच मालेगाव शहरात योजना राबवून सर्व्हे करून प्रत्येक नागरिकास सदनिका उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे गृह निर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांच्या कडे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आर.पी.कुंवर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात पुढे त्यांनी म्हटले आहे की आपत्कालीन परिस्थिती मध्ये शहरात ,गल्ली मोहलात नैसर्गिक आपत्ती झाल्यास अरुंद गल्ली – बोळातून अग्निशामक ,आपत्ती व्यवस्थापन संस्था यांना पोहचता येत नाही परिणामी दुर्दैवी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे   गेल्या आठवड्यातील ताजीच घटना शहरातील  मध्य वस्तीत अचानक आग लागून 12 ते 13 झोपड्या जळून खाक झाल्या त्या ठिकाणी ना.दादासाहेब भुसे ( कृषी मंत्री) यांनी भेट देऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले ,अशा दुर्देवी घटना शहरात घडत असतात एकाच कुटुंबात 5 ते 10 जणांचे कुटूंब हे 10 ते 15 फुटाच्या घरात राहत असून अरुंद गल्ली बोळ असल्या कारणाने एका वेळी एकाच व्यक्तीला ये _ जा करता येते हि भयानक वस्तुस्थिती आहे म्हणून मालेगाव शहरात मुंब्रा , कळवा प्रमाणे गृह प्रकल्प राबविणे गरजेचे आहे.असे जर झाल्यास आपत्कालीन परिस्थितीतून मालेगावच्या जनतेची सुटका होईल असे ही आर.पी.कुंवर यांनी आपल्या निवेदनात पटवून दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here