मुंबई आग्रा महामार्गावर उमराने गावा जवळ ट्रक आणि तवेरा मध्ये भीषण अपघात दोन जागीच ठार तर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

0
37

देवळा : क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “_ प्रतिनिधी _

 

उमरानेजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर एकाच उपचारादरम्यान असे 3 जणांचा मृत्यू झाला. सध्या दाट धुक्यामुळे नाशिक जिल्ह्यात अपघातांच्या घटना वारंवार घडत असल्याचं बोललं जात आहे.

दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघात इतका भीषण आहे की कारचा चक्काचूर झाला आहे.

अपघातग्रस्त कार मालेगावकडून नाशिकडे जात होती.

देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी, 21 रोजी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास उमराणे गावाजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकच्या दिशेने जात असलेली तवेरा कार (एम एच 15 सी एम 7712) हिने ट्रक (एमएच 43 इ 1806 ला) मागून जोरदार धडक दिली.

या भीषण अपघात तवेरा मधील दोन जण जागेवरच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतक दोघे गंभीर जखमी झाले आहेत. देवळा पोलिसात उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here