Home Breaking अपघातग्रस्त पत्रकार सभासदांना नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने ७० ह.मदत,आठ वर्षात...

अपघातग्रस्त पत्रकार सभासदांना नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने ७० ह.मदत,आठ वर्षात ५४ लाख ९३७ ₹ प्रदान.,यापुढेही कार्य चालूच राहणार_ यशवंत पवार

0
147

 

वासोळ : क स मा दे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज ” प्रतिनिधी _जिल्हा मराठी पत्रकार संघामार्फत सभासद पत्रकारांसाठी राबविण्यात येत असलेल्या “अपघात विमा सुरक्षा” योजनेंतर्गत दोघा अपघात ग्रस्त सभासदांना रु.७० हजार रुपयांची आर्थिक मदतीचे धनादेश आज वितरित करण्यात आले.
२०१२ पासून सुरु करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत अपघातात जखमी पत्रकार व मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या वारसदारांना आजतागायत ५४ लाख ९३७ रुपयांची आर्थिक मदत देण्यात आल्याची माहिती संस्थापक-जिल्हाध्यक्ष व मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली.

नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे मेशी (ता.देवळा) येथील सभासद पत्रकार एकनाथ सावळा मोटरसायकल अपघातात तर चांदोरी (ता.निफाड) येथील आकाश गायखे गोदावरीत नदीपात्रातील आपत्कालीन सर्वांना दरम्यान गंभीर जखमी झाले होते.नाशिक येथे वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात सुमारे पंधरा दिवस उपचार केल्यानंतर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने “अपघात सुरक्षा कवच” योजनेंतर्गत विमा कंपनीकडे क्लेमकरुन रक्कम मंजूर करवून घेतली.

उपचारासाठी झालेल्या खर्चापोटी एकनाथ सावळा यांना उमराणे ग्रामपंचायत सभागृहात ४० हजार तर आकाश गायखे यांना लासलगाव कोंबा समिती सभागृहात २४ हजार ४२९ रुपयांची धनादेश यशवंत पवार यांनी सुपूर्द केला.

जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार अॅड.शेखर देसाई, खजिनदार विजय बोराडे,दिनकर आहेर,जिल्हा समन्वयक आण्णा बोरगुडे,बाजीराव खैरनार,निफाड तालुकाध्यक्ष माणिक देसाई, देवळात तालुकाध्यक्ष विशाल मराठे,निलेश देसाई, अरुण खांगळ,वसंत रौंदळ,राकेश बोरा,सौ.संगीता पगार-रौंदळ,
उमेश पारिख,भाऊसाहेब सोनवणे,सागर निकाळे,भगवान देवरे,विनोद पाटणी,अनिल पाटणी,चंद्रशेखर कापसे,आसिफ पठाण, समीर पठाण आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here