June 27, 2022

महाराष्ट्रातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर , 15 जाने.21रोजी मतदान

1 min read

🗞️

मुंबई : क स मा दे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज ” _ प्रतिनिधी _विIधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी सुरळीतपणे निवडणुका पार पडल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. करोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आता जानेवारीत होणार आहेत.

करोना काळात निवडणुका होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींवर नियुक्त करण्यात आलेले प्रशासकराज आता संपुष्टात येणार आहे. मुदत संपलेल्या राज्यातील एकूण १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार १५ जानेवारीला मतदान होणार असून २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर केला. यावर्षीच्या एप्रिल ते जून या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका करोनामुळे होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे तेथे प्रशासक नियुक्त करण्याची वेळ आली. त्यावरूनही राजकारण पेटले होते. प्रकरण कोर्टातही गेले होते. त्यानंतर आता करोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे.

१० डिसेंबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर आता त्यापुढील प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देत असताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करत असताना ग्रामीण भागात निवडणुकांची जोरदार धामधूम पाहायला मिळणार आहे. करोना संबंधीच्या नियमांचे पालन करून निवडणुका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

असा आहे निवडणूक कार्यक्रम _

तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे : १५ डिसेंबर २०२०

उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत : २३ ते ३० डिसेंबर २०२० (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून)

उमेदवारी अर्जांची छाननी : ३१ डिसेंबर २०२०

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत : ४ जानेवारी २०२१

मतदान : १५ जानेवारी २०२१ (सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच)

मतमोजणी : १८ जानेवारी २०२१

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.