नाशिक : क स मा दे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज “- प्रतिनिधी -विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ४ सप्टेंबर १९२७ रोजी समाज समता संघाची स्थापना केली होती तीच संकल्पना घेऊन मा.विलासजी गरूड साहेब यांनी या संघटनेचे पुनरज्जीवन करून संपूर्ण महाराष्ट्रात गणवेशधारी केडर बेस समाज समता संघ या सामाजिक संघटनेची उभारणी करण्याचा संकल्प केला असून संघटन बांधणीचा भाग म्हणून नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत समाज समता संघ ही संघटना पुनरज्जीवित करण्याचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला. सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून या देशात मनूवाद प्रबळ झाला असून संविधानिक व्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न चालू आहे. सर्वोच्च न्यायालय,निवडणूक आयोग, प्रसार माध्यमे ही सत्ताधारी पक्षाच्या हातातील बाहुले झालेले आहेत.बहुतांश सरकारी संस्थांचे खाजगीकरण केले जात आहे. भारतीय संविधान सध्या धोक्यात आले आहे. म्हणून भारतीय संविधानाचे रक्षण करणे, सरकारी संस्थांचे होणारे खाजगीकरण थांबवणे, खाजगीकरण झालेल्या खाजगी क्षेत्रात आरक्षण मिळावे,समाजात समता प्रस्तावित करण,देशातील मनूवाद कमकुवत करून आंबेडकर रूजवणे ही समाज समता संघाची उद्दिष्टे असतील असे त्यांनी सांगितले.या बैठकीला पोपटराव अढांगळे, बापूसाहेब सोनवणे, समीर भडांगे,किशोर पवार, इंगळे सर, जितेंद्र गायकवाड, सागर गायकवाड,विलास जगताप, सचिन जगताप, निनाद अवचार व इतर मान्यवर उपस्थित होते.या बैठकीत समीर भडांगे यांची समाज समता संघ नाशिक शहराध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.भविष्यात नाशिक शहरातील प्रत्येक प्रभागात समाज समता संघाचे केडर बेस संघटन तयार करून लवकरच भव्य मेळावा घेतला जाईल असे नवनिर्वाचित शहराध्यक्ष समीर भडांगे यांनी सांगितले.*
*जय भिम… जय भारत…




