एस टी बसने उग्ररूप धारण केले ,वाहकाने प्रवाशांचे प्राण वाचवले
1 min read
चांदवड / वासोळं – कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रशांत गिरासे – नासिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात आज दुपारी घडलेल्या घटनेत एस टी बस जळून खाक झाल्याचे वृत्त आहे . जिल्ह्यातील मालेगाव डेपो ची बस नासिक कडे जात असताना चांदवड येथील राहुड घाट पास करत असतानाच बस च्या कार्बोरेटर मधून धूर निघत असल्याचे चाणाक्ष चालक देवरे यांच्या लक्षात येताच बस रस्त्याच्या कडेस घेऊन वाहक यांना सांगून प्रवाशांना सुखरूप पणे खाली उतरविण्यात यश मिळविले . 22 प्रवाशी बस मध्ये होते असे वाहकाने सांगितले .अग्निशमन दल ची व सोमा कंपनी ची गाडी आग विझविण्यासाठी येईपर्यंत बसने आपले उग्ररूप धारण केले होते त्यात बस चे साधारण पणे नव्वद टक्के नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे . शॉकसर्किट मुळे आग लागल्याचे सांगितले जाते . यावेळी चांदवड पोलीस स्टेशन चे एपीआय ,रजपूत,शेख व अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते .
