June 27, 2022

सटाणा येथे भुरट्या चोरांनी कांदा बियाणे केले लंपास

1 min read

सटाणा शहरात चोरटयांनी कांदे बियाणे चोरले

वासोळ – कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” – प्रतिनिधी –

सटाणा : सध्या कांदा बियाण्याची सर्वत्र टंचाई असल्यामुळे चढ्या दराने विक्र ी केले जात आहे. बियाण्याला सोन्याचे भाव आल्याने चोरट्यांनी थेट बियाणे विक्र ी केंद्रच फोडून ५० हजार रु पयांचे कांदा बियाणे लुटून नेले. हा प्रकार सटाणा शहरातील मालेगाव रस्त्यावरील न्यू देवराई अग्रो सर्व्हिसेस येथे गुरुवारी (दि.८) उघडकीस आला.
शहरातील मालेगांव रोडवरील प्रभात आॅईलमील समोर असलेल्या विशाल भामरे यांच्या दुकानचे शटर वाकवून चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानातील विक्र ीसाठी असलेले कांद्याचे बियाणे, शेतीपयोगी साहित्य व रोख रक्कम असा ५० हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.