कुमावत, बेलदार समाज शासकीय कंत्राटदार होणार ह्या संधी चा फायदा तरुणांना होणार
1 min read
*कुमावत बेलदार समाज सेवा संघाच्या वतीने समाजातील तरुणांसाठी शासकीय कंत्राटदार होण्यासाठी चे मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबीर संपन्न*

वासोळं:कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रशांत गिरासे
कुमावत बेलदार समाज सेवा संघाच्या वतीने आयोजित केलेले कुमावत समाजातील समाज बांधवांना शासकीय कंत्राटदार होण्यासाठीचे मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर चाळीसगाव येथील हॉटेल ग्रीन लिफच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले.
या शिबिरासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. शासकीय कंत्राटदार म्हणून नोंदणी कशी करावी याबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषदेचे नोंदणी विभागातील अधिकारी वर्ग मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. शासकीय कंत्राटदार म्हणून नोंदणी करताना कराव्या लागणाऱ्या GST, व्यवसायकर इन्कमटॅक्स यासारख्या करांच्या नोंदणी करण्याबाबतचे मार्गदर्शन चार्टड अकाऊंटट व वकील श्री. बोरा साहेब यांनी केले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंदणी करण्याबाबत श्री. वाघ साहेब यांनी मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा परिषद परिषदेकडे नोंदणी करण्याबाबतचे मार्गदर्शन श्री. निरगुडे साहेब यांनी केले. ई टेंडर प्रक्रियेबाबतचे मार्गदर्शन जिल्हा परिषदेचे श्री. पगारे साहेब यांनी केले. त्याचप्रमाणे कामाचे अंदाज पत्रक तयार करण्यापासून ते कामाची निविदा प्रक्रिया कामाचा कार्यारंभ आदेश, कामाची लाईन आऊट, कामाचे मोजमाप, कामाची बिल मिळवणे, क्वालिटी कंट्रोल रिपोर्ट मिळवणे या सगळ्या बाबींवर सखोल मार्गदर्शन पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता श्री, नंदनवार साहेब यांनी केले. व्यंकटेश महाविद्यालयाचे संचालक श्री.बागडे यांनी बांधकाम सुपरवायझर कोर्स ची माहिती दिली. सर्व मान्यवरांचे मार्गदर्शन संपल्यानंतर उपस्थितांच्या शंका निरसनासाठी सामोहिक प्रश्नोत्तराचा तास घेण्यात आला.कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व बांधवांना शासकीय कंत्राटदार म्हणून नोंदणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या माहितीच्या पुस्तिकेचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तर देत मान्यवरांनी त्यांच्या शंकाचे समाधान केले. बदलत्या परिस्थितीनुसार समाजबांधवांनी बांधकाम क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी म्हणून कुमावत बेलदार समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीकांतजी परदेशी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात आला. समाजामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम प्रथमच झाल्यामुळे समाज बांधवांना अत्यंत समाधान व्यक्त केले. चाळीसगाव तालुका कार्यकारिणीने कार्यक्रमाचे आणि कार्यक्रमाआधी उपस्थित सर्व समाजबांधवांच्या भोजन व्यवस्थेचे आयोजन अत्यंत काटेकोरपणे व सुसूत्रपणे केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमावत बेलदार समाज सेवा संघाचे नाशिक जिल्हा सचिव श्री. प्रदीपजी कुमावत यांनी केले.
कार्यक्रमानंतर नंदुरबार जिल्हा युवा कार्यकारणी तसेच देवळा तालुका युवा कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा पार पडला. उपस्थित युवा पदाधिकाऱ्यांना निवड पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर कुमावत बेलदार समाज सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीकांतजी परदेशी, प्रदेशाध्यक्ष श्री. वसंतरावजी मुंडावरे, उपाध्यक्ष श्री. प्रदीपजी कामे, प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री. प्रभाकरजी कर्डीवाळ, संभाजी नगर जिल्हा अध्यक्ष श्री. संजयजी बारवाल, जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री. भाऊसाहेबजी कुमावत, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री. दिपकजी घोडेले संभाजीनगर ग्रामीण अध्यक्ष श्री. दत्तात्रयजी नारोळे, जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष श्री. विनोदजी कुमावत, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष श्री. राजेंद्रजी कामे,तसेच संभाजीनगर शिवसेना शहर प्रमुख श्री. विजूभाऊ वाघचौरे कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. चाळीसगाव तालुका अध्यक्ष श्री. रामेश्वरजी कुमावत यांनी उपस्थित समाज बांधवांचे आणि प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.