June 27, 2022

पहिला वार छातीवर घेणार ,पण मराठा आरक्षण मिळविणार नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत संभाजीराजे छत्रपती यांचा निर्णय

1 min read

वासोळं: प्रशांत गिरासे –

मराठा आरक्षणा चा तिढा ई डब्ल्यू एस मध्ये आरक्षण नको समाजा साठी पहिला वार छातीवर घेण्यास तयार असल्याचे संभाजी राजे छत्रपती यांनी बैठकीत बोलताना सांगितले.

मराठा आरक्षणाचा प्रश्न घटनादुरुस्तीमुळे सुटणार असल्याने केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी वेळ पडल्यास दिल्लीतही धडक देऊ, असा इशारा मराठा क्रांती माेर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत शनिवारी देण्यात आला. त्याचप्रमाणे मराठा समाजाला ईडब्ल्यूएसमध्ये आरक्षण नको, असा महत्त्वाचा ठराव करण्यात आला. महात्मा गांधींच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबरला राज्यातील सर्व खासदार, आमदारांच्या घरासमोर आणि ५ ऑक्टोबरला राज्यातील प्रत्येक तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्याचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. तसेच १० ऑक्टाेबरला हाेणाऱ्या आंदाेलनात मराठा क्रांती माेर्चा सहभागी हाेणार नसल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयाने स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. विविध शहरांत मराठा क्रांती माेर्चा, संघटनांकडून आंदाेलने हाेत आहेत. मात्र याला एकत्रित दिशा देण्यासाठी नाशिकमध्ये मराठा क्रांती माेर्चा, सकल मराठा समाजाच्या विविध संघटनांची बैठक झाली.

मराठा समाजाचा नेता म्हणून नाही तर छत्रपतींचा मावळा म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या कुठल्याही मोहिमेवर मी समाजासोबत आहे. कुठलाही पहिला वार माझ्या छातीवर घेण्यास तयार आहे, असे खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले. तर, छत्रपती खासदार उदयनराजे भाेसले यांच्या काकूंचा दशक्रिया विधी असल्याने ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी बैठकीसाठी पाठवलेला संदेश त्यांचे भाचे जयेशराजे पवार यांनी वाचून दाखवला.

More Stories

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.