Home Breaking आदर्श शिक्षक संदीप येवले यांची सिंगापूर अभ्यास दौऱ्यासाठी निवड

आदर्श शिक्षक संदीप येवले यांची सिंगापूर अभ्यास दौऱ्यासाठी निवड

0
7
Oplus_131072

भारत पवार : मुख्य संपादक : ९१५८४१७१३१          पुणे : क.टा. महाराष्ट्र न्यूज  : ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : शोभा बल्लाळ _ 
शैक्षणिक क्षेत्रात होणारे नवनवीन बदल व नवीन शैक्षणिक तंत्रज्ञान नवीन अत्याधुनिक शिक्षण व्यवस्था यांचा अभ्यास करून ती जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देणे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स च्या सहकार्याने पुणे जिल्हा परिषदेने ग्लोबल मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन जी पाटील साहेब यांच्या प्रेरणेने गुरुजी हा उपक्रम शैक्षणिक वर्ष 26/ 27 मध्ये राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हा परिषद पुणे अंतर्गत नामनिर्देशित शिक्षकांसाठी ग्लोबल गुरुजी या उपक्रमा अंतर्गत प्रथम फेरीची संगणक आधारित परीक्षा सी बी टी दिनांक 9/ 8 /2026 रोजी तेरा तालुक्यांमध्ये घेण्यात आली होती.
त्यातून जिल्ह्यातून बाराशे बारा शिक्षकांमधून 136 शिक्षक मुलाखतीसाठी पात्र झाले होते. या 136 शिक्षकांची मुलाखत घेऊन त्यातून सिंगापूर दौऱ्यासाठी 45 जणांची अधिकृत निवड यादी दिनांक 4 /9/ 2026 रोजी शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केली. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील 45 शिक्षक व तीन केंद्रप्रमुख असे एकूण 48 जण सिंगापूर दौऱ्यासाठी अधिकृत निवडण्यात आले आहेत.
त्यामध्ये इंदापूर तालुक्यातील चार शिक्षकांचा समावेश असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटील वस्ती गोतोंडी केंद्र शेळगाव चे अध्यक्ष उपक्रमशील शिक्षक श्री संदीप पांडुरंग येवले यांची त्यामध्ये निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदन आजचा सर्व स्तरावर होत आहे.
संदीप येवले सर यांना यापूर्वी अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
1 इंदापूर तालुका आदर्श गुणवंत पुरस्कार तत्कालीन मंत्री सन्माननीय हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या हस्ते मिळाला होता.
2 जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तत्कालीन उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेब यांच्या हस्ते भेटला होता. असे अनेक पुरस्काराने त्यांना पुरस्कृत करण्यात आलेले आहेत त्यापैकी हे दोन महत्वाचे.
संदीप येवले यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here